श्रीलंकेत ४१ संशयितांची खाती गोठवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 04:52 IST2019-05-26T04:52:33+5:302019-05-26T04:52:37+5:30
श्रीलंकेत बंदी असलेली अतिरेकी संघटना नॅशनल तौहीद जमातशी (एनटीजे) संबंध असलेल्या ४१ संशयित अतिरेक्यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत.

श्रीलंकेत ४१ संशयितांची खाती गोठवली
कोलंबो : श्रीलंकेत बंदी असलेली अतिरेकी संघटना नॅशनल तौहीद जमातशी (एनटीजे) संबंध असलेल्या ४१ संशयित अतिरेक्यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. देशात ईस्टर सणाच्या दिवशी झालेल्या मालिका स्फोटांत याच संघटनेचा हात होता. या हल्ल्यांनी संपूर्ण देश हादरून गेला होता. या हल्ल्यांत २५८ जण ठार तर ५०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.
पोलिसांचे प्रवक्ते रुवान गुणशेखर यांनी सांगितले की, या संशयितांच्या खात्यात एकूण १३ कोटी ४० लाख रूपये आहेत. ही रक्कम त्यांना अटक झाली तेव्हा त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या एक कोटीÞ ४० लाख रूपयांपेक्षा वेगळी होती.
प्रारंभी इसिसने त्या हल्ल्यांची जबाबदारी घेतली होती परंतु सरकारने स्थानिक एनटीजेला
या हल्ल्यांसाठी जबाबदार ठरवले होते.