उद्यानात आला कोठून ४० फुटांचा मासा?

By Admin | Updated: June 9, 2017 03:56 IST2017-06-09T03:56:46+5:302017-06-09T03:56:46+5:30

हान मुलांच्या उद्यानात एक ४० फुटांचा मासा येऊन पडल्यामुळे अमेरिकेतील ओक्लाहोमा येथे खळबळ उडाली

40ft fish in the park? | उद्यानात आला कोठून ४० फुटांचा मासा?

उद्यानात आला कोठून ४० फुटांचा मासा?


न्यूयॉर्क : लहान मुलांच्या उद्यानात एक ४० फुटांचा मासा येऊन पडल्यामुळे अमेरिकेतील ओक्लाहोमा येथे खळबळ उडाली आहे. सफाई कामगार सकाळी येथे आले तेव्हा त्यांना प्रथम हा मृत व्हेल मासा दिसला. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. या उद्यानात कोणतेही वाहन आल्याच्या खुणा नाहीत. मग एवढा मोठा मासा येथे आलाच कसा, असा सवाल उपस्थित झाला आहे. काही जणांचे असे म्हणणे आहे की, हा मासा शिकारीचा पाठलाग करीत नदीतून येथे आला असावा. हे उद्यान नदीच्या किनाऱ्यावरच आहे. अर्थात, असे अनेक तर्कवितर्क केले जात असले तरी नेमके कारण कुणीच सांगू शकत नाही. अफवा तर अशाही आहेत की, एलियन या माशाला येथे सोडून गेला असावा.

Web Title: 40ft fish in the park?