शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

पाकिस्तानमध्ये 40 दहशतवादी संघटना सक्रिय, इम्रान खान यांचा कबुलीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 10:50 AM

पाकिस्तानमध्ये जवळपास 40 दहशतवादी संघटना सक्रिय आहे.

वॉशिंग्टनः पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पाकिस्तानमध्ये दहशतवादाला खतपाणी मिळत असल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य केलं आहे. पाकिस्तानमध्ये जवळपास 40 दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. पाकिस्तानच्या आधीच्या सरकारांनी गेल्या वर्षांत अमेरिकेला ही गोष्ट सांगितली नाही. अमेरिकेतल्या जनतेला संबोधित करताना ते बोलत होते. पाकिस्तानचा 9/11 हल्ल्याशी काहीही संबंध नाही.अल कायदा अफगाणिस्तानमध्ये सक्रिय होती. पाकिस्तानमध्ये कोणतेही तालिबानी दहशतवादी राहत नाहीत. आम्ही अमेरिकेला खऱ्या गोष्टींपासून अनभिज्ञ ठेवलं, त्यासाठी मी पाकिस्तान सरकारला जबाबदार धरतो. 40 वेगवेगळ्या दहशतवादी संघटना पाकिस्तानात सक्रिय आहेत. त्यामुळेच पाकिस्तानला अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. जेव्हा अमेरिका दहशतवादाविरोधात युद्ध लढण्यासाठी आमची मदत मागत होता. तेव्हा आम्ही पाकिस्तानच्याच अस्तित्वाला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो.मी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अन्य अमेरिकी नेत्यांची भेट घेतली आहे. द्विपक्षीय संबंध हे एकमेकांवरच्या विश्वासावर अवलंबून असतात. पाकिस्तान शांती प्रक्रियेत सहभागी असल्याचं आम्ही अमेरिकेला आश्वासन दिलं आहे. आम्ही तालिबान्यांचीही मनधरणी करत आहोत. परंतु ही समस्या लागलीच सुटणारी नाही. अफगाणिस्तानची परिस्थिती फारच गुंतागुंतीची आणि जटील झाली आहे. तरीही आम्ही अफगाणिस्तानमध्ये शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करू. पाकिस्तानची सेना, सुरक्षा बल आणि सर्वच माझ्या पाठीमागे आहेत. अफगाणिस्तानमध्ये कायमची शांतता पसरावी, यासाठी आम्ही कायमच प्रयत्न करत राहू, असं इम्रान खान म्हणाले आहेत. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पterroristदहशतवादी