शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
2
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
3
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
4
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
5
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
6
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
7
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
8
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
9
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
10
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
11
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
12
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
13
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
14
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
15
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
16
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
17
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
18
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
19
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
20
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल

३८ कोटी वर्षांपूर्वीच्या माशाचे हृदय जीवाश्मात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 7:16 AM

पश्चिम ऑस्ट्रेलियातील गोगो फॉर्मेशनमध्ये शास्त्रज्ञांना एक अति प्राचीन जीवाश्म आढळले आहे.

लंडन : तब्बल ३८ कोटी वर्षांपूर्वीचे माशाचे हृदय जीवाश्मामध्ये आढळले असून, याद्वारे मानवाच्या शरीराच्या विकासावर प्रकाश टाकण्यास मदत मिळणार आहे, असे कर्टिन विद्यापीठातील शास्त्रज्ञांना वाटते.

पश्चिम ऑस्ट्रेलियातील गोगो फॉर्मेशनमध्ये शास्त्रज्ञांना एक अति प्राचीन जीवाश्म आढळले आहे. हे जगातील सर्वांत जुने म्हणजेच तब्बल ३८ कोटी वर्षांपूर्वीचे माशाचे हृदय आहे. प्रो. अहरबर्ग यांनी सांगितले की, थ्री डी प्रतिमांच्या अभ्यासातून कळते की, या माशाचे हृदय एस आकाराचे व दोन कक्षांचे होते. संशोधकांच्या पथकाचे नेतृत्व करणाऱ्या प्रोफेसर केट ट्रिनाजस्टिक यांनी सांगितले, या प्राचीन जीवाश्मांमुळे कळते की, जबडा व जबड्याचे पृष्ठवंशी यांच्यात फार फरक होता. या माशांचे हृदय खरोखरच त्यांचे तोंड व त्यांच्या गालाखाली होते. आज शार्कचे तसेच आहे. याचे नमुने स्कॅन करण्यासाठी न्यूटॉन बीम व सिंक्रोटॉन एक्स-रेचा वापर करण्यात आला. 

आतडे, हृदय सुरक्षितn शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हा जीवाश्म जबडे असणाऱ्या एका माशाचा आहे. त्याचे पोट, यकृत, हृदय व आतडे सुरक्षित आहेत. n हे माशाचे हृदय असले तरी त्यामुळे मानवी शरीराच्या विकासावर प्रकाश टाकण्यास मदत मिळेल, असे संशोधनकर्त्यांना वाटते. या हृदयात दोन कक्ष आहेत. त्यातील छोटा कप्पा वर आहे. n हा जीवाश्म आधुनिक शार्क शरीर रचनेसारखा असावा. या जीवाश्माचे बहुतांश अवयव सुरक्षित आहेत, हे पाहून तर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Londonलंडनfishermanमच्छीमार