भन्नाट! खाणीतून सापडला तब्बल ३७८ कॅरेटचा हिरा; किंमत ऐकून व्हाल हैराण
By देवेश फडके | Updated: January 30, 2021 16:38 IST2021-01-30T16:34:28+5:302021-01-30T16:38:10+5:30
दक्षिण आफ्रिकेतील बोत्सवाना नामक देशातील एका खाणीत तब्बल ३७८ कॅरेटचा हिरा सापडला आहे. कॅनेडियन संशोधकांनी हा हिरा शोधून काढला आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र
बोत्सवाना : दक्षिण आफ्रिकेतील बोत्सवाना नामक देशातील एका खाणीत तब्बल ३७८ कॅरेटचा हिरा सापडला आहे. कॅनेडियन संशोधकांनी हा हिरा शोधून काढला आहे. सर्वोच्च गुणवत्ता असलेला हा हिरा तब्बल ११० कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले जात आहे.
ल्युसारा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ईरा थॉमस यांनी यासंदर्भातील अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले. सन २०२१ च्या सुरुवातीलाच अशा प्रकारचा हिरा सापडणे हा शुभ संकेत असून, आगामी वर्ष मजबूत ठरेल, अशा विश्वास थॉमस यांनी यावेळी व्यक्त केला.
धक्कादायक! 'या' देशात ७० हजार जणांना दिली बनावट लस; तीन डोसांचे घेतले ३३०० रुपये
बोत्सवानामधील कारोव खाणीत उच्च गुणवत्तेचा हिरा सापडल्याने याची क्षमता अधिक बळकट झाली आहे. सन २०२६ पर्यंत कारोवमधील खनिज क्षेत्राची अधिकाधिक माहिती मिळवून आगामी १३ वर्षांपर्यंत या भागात उत्खननाचे काम सुरू राहील, असेही थॉमस यांनी सांगितले. ३०० प्लस प्रकारात सापडलेला हा दुसरा हिरा असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कारोवच्या खाणीत सापडलेला हा हिरा सन २०१५ मध्ये सापडलेल्या २०० कॅरेटच्या हिऱ्यापेक्षा अधिक मजबुतीचा ५५ वा हिरा आहे, असे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हिऱ्याची मागणी नेहमीच अधिक असते. हिऱ्याचे कॅरेट जेवढे जास्त, तेवढी त्याची किंमतही अधिक असते. कॅरेट हे महागडे धातू आणि हिऱ्याच्या शुद्धतेच्या मापनाचे परिमाण आहे.