शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

३५ टक्के तरुण जगताहेत आई-बापाच्या जिवावर! अमेरिकेतील सर्वेक्षणाने घातले अंजन; संपूर्ण खर्चापैकी ५८% पालकांकडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 06:54 IST

Family Income: पाश्चिमात्य देश पुढारलेले, तेथील तरुण वयाच्या १५ व्या वर्षांपासूनच स्वत:च्या पायावर उभे राहतात, असे अनेक गैरसमज एका सर्वेक्षणाने खोटे पाडले आहेत.

न्यूयॉर्क : पाश्चिमात्य देश पुढारलेले, तेथील तरुण वयाच्या १५ व्या वर्षांपासूनच स्वत:च्या पायावर उभे राहतात, असे अनेक गैरसमज एका सर्वेक्षणाने खोटे पाडले आहेत. त्यानुसार दहापैकी नऊ तरुण स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम समजतात; परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. अमेरिकेतील तरुण आपल्या ‘मॉम-डॅड’वर किती अवलंबून आहे हे यावरून लक्षात येते की, यामध्ये १९% भाडे व किराणा, दैनंदिन जीवनात वापरण्यात येणारे २६% साहित्य पालकांकडून घेतले जाते. ७२% तरुणांना असा विश्वास आहे की ते पुढील २ वर्षांत स्वतःची काळजी घेण्यास सक्षम होतील; परंतु ३०% तरुणांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होईपर्यंत असे काही करता येणार नाही, असे वाटते.

खर्च व्यवस्थापनात सक्षम नाहीत तरी...n चार्टवे क्रेडिट युनियन सर्वेक्षणानुसार खर्च व्यवस्थापन करण्यास सक्षम नसतानाही, ६५% युवक चांगले क्रेडिट स्कोअर आर्थिक जबाबदारीचे सूचक मानतात.n इतरांना कर्जाची कमतरता व त्यांच्या बचतीची रक्कम तितकीच महत्त्वाची वाटते. एका महिन्यात तरुणांना सरासरी ६ वेगवेगळी बिले आणि खर्च येतो. यामध्ये अन्न, विमा, इंटरनेट व भाडे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.

तरुण बँक खाते उघडण्यातही मागेसर्वेक्षणात असे आढळून आले की अमेरिकेतील जवळजवळ तीन चतुर्थांश तरुणांनी त्यांचे पहिले बँक खाते त्यांच्या २५ व्या वाढदिवसापूर्वी उघडले आणि २१% तरुणांनी वयाच्या १८ व्या वर्षापूर्वी बँक खाते उघडले. ३०% तरुण असे आहेत ज्यांनी वयाच्या १५ व्या वर्षी खर्च करण्यास सुरुवात केली. पाचपैकी २ तरुणांना अजूनही आर्थिक स्रोतांचा सामना करावा लागत आहे. इतर पिढ्यांच्या तुलनेत सर्वांत केवळ ११% वृद्ध आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत असताना, ५०% तरुणांना अनावश्यक खर्चावर मर्यादा घालण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे.

टॅग्स :FamilyपरिवारInternationalआंतरराष्ट्रीय