शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

जमिनीखाली सापडली 3300 वर्ष जुनी 'गुलाबी कबर', समोर येणार राजांचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 16:11 IST

हा इजिप्तचा महान राजा रामसेसे द ग्रेटचा कोषाध्यक्ष होता. पुरातत्ववाद्यांनी य़ा शोधाला स्वप्नातील शोध म्हटलं आहे.

इजिप्तची राजधानी काहिरामध्ये हजारो वर्ष जुनी एक कबर सापडली आहे. असं सांगितलं जात आहे की, ही कबर एका महान इजिप्तच्या अधिकाऱ्याची आहे. ही कबर गुलाबी ग्रेनाइट दगडापासून तयार केलेली आहे. ही कबर काहिरामध्ये मृतदेह दफन केलेल्या एका प्राचीन चेंबरमध्ये सापडली आहे. ही कबर पटाह-एम-विया ची असल्याचं सांगितलं जात आहे. हा इजिप्तचा महान राजा रामसेसे द ग्रेटचा कोषाध्यक्ष होता. पुरातत्ववाद्यांनी य़ा शोधाला स्वप्नातील शोध म्हटलं आहे.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, या दगडाच्या कबरेच्या चारही बाजूने प्रतिके, चित्रलिपी आणि काही शब्द कोरलेले आहेत. हे 3,300 वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. ही कबर जमिनीच्या 23 फूट खालून वर काढण्यात आली.

दगडपासून तयार या कबरेचा शोध लावणाऱ्या ओला एल अगुइजिन यांना आशा आहे की, या शोधाच्या माध्यमातून तुतनखामुननंतर इजिप्तवर राज्य करणाऱ्या राजांबाबत बरीच माहिती मिळवली जाऊ शकते.

अगुइजिन म्हणाल्या की, कबरेवर दिसलेली चित्रलिपी याचा पुरावा आहे की, कबर पटाह-एम-विया याचीच आहे. कबरेवर लिहिलेले टायटल्स हे दर्शवतात की, तो एक महान व्यक्ती होता आणि राजाच्या फार जवळचा होता. तेव्हाच्या शासन व्यवस्थेत त्याची महत्वाची भूमिका राहिली असेल. ते तेव्हाच्या शासन व्यवस्थेत अर्थमंत्री होते.

पटाह-एम-वियाच्या या कबरेबाबत नॅशनल जिओग्राफीचा शो Lost Treasure Of Egypt च्या चौथ्या सीरीज दरम्यान माहिती दिली होती. इजिप्तच्या पर्यटन मंत्रालयाने सांगितलं की, दगडापासून तयार ही कबर चांगल्या स्थितीत आहे. फक्त कबरेच्या झाकणाचा एक भाग तुटला आहे.

प्रोफेसर ओला एल अगुइजिन यांची टीम आता या दगडाच्या कबरेचा अभ्यास करतील. पटाह-एम-विया च्या आयुष्याबाबत अनेक गोष्टींची माहिती मिळवली जाईल. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके