राजधानी बगदादमध्ये ३३ जणांची निर्घृण हत्या
By Admin | Updated: July 14, 2014 00:26 IST2014-07-14T00:26:57+5:302014-07-14T00:26:57+5:30
इराकची राजधानी बगदाद येथील दोन इमारतीत घुसखोरी करत बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार करत कमीत कमी ३३ जणांची निर्घृण हत्या केली.

राजधानी बगदादमध्ये ३३ जणांची निर्घृण हत्या
बगदाद : इराकची राजधानी बगदाद येथील दोन इमारतीत घुसखोरी करत बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार करत कमीत कमी ३३ जणांची निर्घृण हत्या केली. मृतांमध्ये जवळपास २० महिला असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बगदादनजीकच्या झायोना भागात शनिवारी रात्री उशिरा हा हल्ला झाला. सर्वत्र मृतदेहांचा खच पडला होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. हल्ल्यामागील कारण स्पष्ट झाले नसून कुणीही याची जबाबदारी घेतली नाही. या दोन्ही इमारतींमध्ये कुंटणखाना चालत असल्याचा संशय घेऊन शिया बंडखोरांनी हा हल्ला केल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.