कोलंबियातील स्फोटामध्ये ३० जखमी
By Admin | Updated: February 20, 2017 01:50 IST2017-02-20T01:50:57+5:302017-02-20T01:50:57+5:30
कोलंबियाची राजधानी असलेल्या बोगाटा येथे बूल फायटिंगच्या विरोधात आंदोलन सुरु असताना

कोलंबियातील स्फोटामध्ये ३० जखमी
>बोगाटा: कोलंबियाची राजधानी असलेल्या बोगाटा येथे बूल फायटिंगच्या विरोधात आंदोलन सुरु असताना झालेल्या स्फोटामध्ये ३० जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी घडली. या स्फोटामध्ये पशू मित्रांसह काही पोलीस कर्मचारीदेखील जखमी झाले. स्फोटाचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.