बगदादमध्ये फुटबॉल मॅचदरम्यान झालेल्या आत्मघाती स्फोटात 30 जणांचा मृत्यू
By Admin | Updated: March 26, 2016 14:04 IST2016-03-26T14:00:25+5:302016-03-26T14:04:28+5:30
इराकची राजधानी बगदादमध्ये फुटबॉल मॅचनंतर सुरु असलेल्या बक्षिस वितरण समारंभात झालेल्या आत्मघाती हल्लेखोराने केलेल्या स्फोटात 30 जणांचा मृत्यू झाला असून 71 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आ

बगदादमध्ये फुटबॉल मॅचदरम्यान झालेल्या आत्मघाती स्फोटात 30 जणांचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत -
बगदाद, दि. २६ - इराकची राजधानी बगदादमध्ये फुटबॉल मॅचनंतर सुरु असलेल्या बक्षिस वितरण समारंभात झालेल्या आत्मघाती हल्लेखोराने केलेल्या स्फोटात 30 जणांचा मृत्यू झाला असून 71 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता हा हल्ला झाला.
बक्षिस वितरण समारंभ सुरु असताना आत्मघाती हल्लेखोर गर्दीत घुसला आणि स्वताला उडवून दिले अशी माहिती पोलीस अधिका-यान दिली आहे. बगदादपासून 40 किमी अंतरावर असलेल्या इसकंदरिया गावात हा हल्ला झाला. या गावात शिया आणि सुन्नी पंथाचे लोक राहतात. मृतांची संख्या वाढू शकते असं अधिका-यांनी सांगितलं आहे.