30 दहशतवाद्यांना घातल्या गोळ्या

By Admin | Updated: June 22, 2014 01:37 IST2014-06-22T01:37:11+5:302014-06-22T01:37:11+5:30

पाकिस्तानी लष्कराने हिंसाचारग्रस्त उत्तर वजिरिस्तान भागात शनिवारी केलेल्या हवाई हल्ल्यात 3क् दहशतवादी मारले गेले.

30 bullets targeted by terrorists | 30 दहशतवाद्यांना घातल्या गोळ्या

30 दहशतवाद्यांना घातल्या गोळ्या

>इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कराने हिंसाचारग्रस्त उत्तर वजिरिस्तान भागात शनिवारी केलेल्या हवाई हल्ल्यात 3क् दहशतवादी मारले गेले. यामुळे तालिबानविरोधी लष्करी मोहिमेत खात्मा झालेल्या दहशतवाद्यांची संख्या 26क् हून अधिक झाली आहे.
उत्तर वजिरिस्तानच्या हस्सू खेल भागातील दहशतवादी अड्डय़ांवर सकाळी पाच वाजता केलेल्या हल्ल्यांत 2क् दहशतवादी मारले गेले, असे मेजर जनरल असीम सलीम बजवा यांनी सांगितले. त्याचबरोबर पाक- अफगाणिस्तान सीमेलगतच्या खैबर भागातही हल्ले करण्यात आले. यात दहा दहशतवादी मारले गेले, असे बजवा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कराची आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर तेहरीक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेविरुद्ध लष्कराने गेल्या रविवारपासून मोहीम सुरू केली असून या मोहिमेत आतार्पयत 26क् दहशतवादी मारले गेले आहेत.
(वृत्तसंस्था)
 
 

Web Title: 30 bullets targeted by terrorists