दहशतवाद्यांकडून 30 अफगाणी नागरिकांची हत्या
By Admin | Updated: October 26, 2016 13:28 IST2016-10-26T13:20:47+5:302016-10-26T13:28:36+5:30
इस्लामिक स्टेटच्या संशयित दहशतवाद्यांनी 30 अफगाणी नागरिकांची अपहरण करून हत्या केल्याची माहिती आफगाणी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दहशतवाद्यांकडून 30 अफगाणी नागरिकांची हत्या
>ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. 26 - इस्लामिक स्टेटच्या संशयित दहशतवाद्यांनी 30 अफगाणी नागरिकांची अपहरण करून हत्या केल्याची माहिती आफगाणी अधिकाऱ्यांनी दिली आहे. अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी आयएसच्या एका कमांडरला ठार मारले होते. त्याच्या हत्येचा बदला म्हणून आयएसने हे हत्याकांड घडवून आणले.
"अपगाण पोलिसांनी मंगळवारी घोर प्रांतात झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांच्या एका कमांडरला ठार मारले होते. त्यानंतर दहशतवाद्यांनी घोर प्रांताच्या राजधानीजवळून 30 अफगाणी नागरिकांचे अपहरण केले होते. त्यानंतर कमांडरच्या हत्येचा बदला म्हणून या सर्वांची हत्या करण्यात आली," असे प्रांताच्या राज्यपालांचे प्रवक्ते अब्दुल हाई खातिब यांनी दिली. दरम्यान, कुठल्याही दहशतवादी संघटनेने या हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.