शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

३ लाख सैन्याला सज्ज राहण्याचे आदेश; पराभव लागला जिव्हारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 06:54 IST

पुतीन यांचा निर्णय; पराभव लागला जिव्हारी

मॉस्को : युक्रेनच्या सैन्याने काही ठिकाणी रशियाच्या सैनिकांचा केलेला पराभव रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या जिव्हारी लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर रशियातील तीन लाख राखीव सैनिकांना सज्ज राहण्याचा आदेश पुतीन यांनी दिला आहे. या सैनिकांना युक्रेनच्या सीमेवर पाठविण्यात येण्याची शक्यता आहे. पाश्चिमात्य देशांच्या लष्करी यंत्रणेविरोधात लढा देण्यासाठी आपण हे पाऊल उचलल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे.त्यांनी बुधवारी ही घोषणा केली. पुतीन यांनी पाश्चिमात्य देशांना इशारा दिला की, रशियाच्या भूमीचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे उपाय योजणार आहोत. 

युद्धाला २४ फेब्रुवारी रोजी रशियाने सुरुवात केली. हे युद्ध कधी संपणार हे अनिश्चित आहे. युक्रेनची युद्धामध्ये खूप मोठी हानी झाली आहे. मात्र त्या देशाला नाटो सदस्य देश व अन्य पाश्चिमात्य देशांनी शस्त्रास्त्रे तसेच निधीची मोठ्या प्रमाणावर मदत केली. रशियाच्या लष्कराने युक्रेनचा जो भाग काबीज केला होता, त्यांपैकी काही ठिकाणांहून युक्रेनच्या सैनिकांनी रशियाच्या लष्कराला हुसकावून लावले. युक्रेनच्या लष्कराला पाश्चिमात्य देशांनी दिलेल्या अत्याधुनिक शस्त्रांमुळे हा विजय मिळविणे शक्य झाले. 

पुतीन यांची कृती लाजिरवाणी - बायडेनयुक्रेनमधील युद्धात रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्यातील तरतुदींचा भंग केला आहे. ही अतिशय लाजिरवाणी कृती असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बुधवारी बायडेन यांनी भाषण केले. ते म्हणाले की, युक्रेनमधील युद्ध हे अनावश्यक आहे. पुतीन यांनी युरोपला अणुयुद्धाच्या धमक्या दिल्या आहेत.

टॅग्स :russiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया