शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

सुदानमधील टँकर स्फोटात १८ भारतीय ठार, ३० जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 01:54 IST

बेपत्ता भारतीयांपैकी काही जण मृतांच्या यादीत असू शकतील.

खार्टूम (सुदान) : खार्टूममधील बाहरी भागातील सिरॅमिक कारखान्यात मंगळवारी एलपीजी टँकरचा स्फोट होऊन २३ जण ठार, तर १३० जण जखमी झाले. मृतांमध्ये किमान १८ भारतीय आहेत, असे भारतीय वकिलातीने बुधवारी सांगितले. स्फोटानंतर १६ भारतीय बेपत्ता होते. ताज्या वृत्तानुसार किमान १८ जण मरण पावले असले तरी या संख्येला दुजोरा मिळालेला नाही, असेही वकिलातीने म्हटले. गंभीर जखमी झालेल्या चार भारतीयांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बेपत्ता भारतीयांपैकी काही जण मृतांच्या यादीत असू शकतील. मृतदेह फारच जळालेले असल्यामुळे आम्ही अजूनही त्यांची ओळख पटवू शकलेलो नाही, असे त्यात म्हटले. नवी दिल्लीतील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारखान्यात ६८ भारतीय काम करीत होते.परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले की, काही भारतीय कामगारांना जीव गमवावा लागला व काही गंभीर जखमी झाले हे फारच दु:खदायक झाले.अपघात घडला त्या ठिकाणी दुतावासातून प्रतिनिधी दाखल झाला. २४ तास तातडीची सेवाही हॉटलाईनवर (२४९-९२१९१७४७१) उपलब्ध करण्यात आलीआहे.दुतावासाकडून समाज माध्यमांवर ताज्या घडामोडी दिल्या जात आहेत. कामगारांच्या कुटुंबियांसाठी आम्ही प्रार्थना करतो, असेही जयशंकर यांनी टिष्ट्वटरवर म्हटले.भारतीय दुतावासाने बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले, बेपत्ता किंवा या दुर्घटनेतून वाचलेल्या भारतीयांची यादी प्रसिद्ध केली. या यादीनुसार सात भारतीयांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ३४ भारतीय यात बचावले असून त्यांना सलुमी सिरॅमिक्स फॅक्ट्रीच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)सुरक्षेबद्दल गांभीर्य नाहीसुदानच्या सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार गॅस टँकरमध्ये स्फोट झाला व त्याने औद्योगिक क्षेत्रात आग लागली.प्राथमिक निरीक्षणानुसार कारखान्यात सुरक्षेची आवश्यक उपाययोजना व उपकरणांची उणीव दिसली. या शिवाय ज्वलनशील साहित्यही वाट्टेल तसे साठवून ठेवले गेले होते.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय