शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गाझावर ३.६ लाख सैन्य हल्ला करणार; १० लाख लोकांना शहर सोडण्याचे इस्रायलचे फर्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 12:38 IST

उत्तर गाझामधील तब्बल १० लाख लोकांनी २४ तासांत गाझा शहर सोडण्याचे आदेश इस्रायलच्या सैन्याने दिले आहेत.

जेरुसलेम : इस्रायलचे ३.६० लाख सैनिक कोणत्याही क्षणी गाझावर हल्ला करण्याच्या तयारीत असून, उत्तर गाझामधील तब्बल १० लाख लोकांनी २४ तासांत गाझा शहर सोडण्याचे आदेश इस्रायलच्या सैन्याने दिले आहेत. संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी ही माहिती दिली. लाखो लोकांना शहर सोडण्यास सांगितल्याच्या या आदेशाचे विनाशकारी परिणाम होण्याची भीती असल्याचे त्यांनी म्हटले. सध्या गाझामध्ये २३ लाख लोक राहतात.

हमासने एका आठवड्यापूर्वी  इस्रायलवर धक्कादायक आणि क्रूर हल्ला केला होता. त्याचा बदला म्हणून इस्रायलने गाझावर  ६ दिवसांत तब्बल ६ हजार बॉम्ब टाकले आहेत. यात अनेक नागरिकांचा मृत्यू होत आहे. अनेकांचे अपहरण सुरू असून, अंदाधुंद हत्या करण्यात येत आहेत. गाझाचा वीज, पाणी, इंधन, औषध पुरवठा रोखण्यात आल्यामुळे ५० हजार गरोदर महिलांना शुद्ध पाणी मिळेनासे झाले आहे. औषध पुरवठा होत नसल्याने अनेक जखमींचे प्राण संकटात आले आहेत. दरम्यान, बीजिंगमधील इस्रायली दूतावासातील एका कर्मचाऱ्यावर भर बाजारपेठेत चाकूने हल्ला करण्यात आला.

इस्रायली हल्ल्यात ७० ठार -गाझा शहरातून बाहेर पडणाऱ्या लोकांच्या समूहांवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात ७० लोक ठार झाले आहेत. यात बहुतेक महिला आणि मुले आहेत, असे हमासच्या मीडिया कार्यालयाने सांगितले.

जगणार असाल तरच...- लाखो पॅलेस्टिनी लोकांचे घर असलेल्या गाझा शहरातून बाहेर पडण्याचे आदेश आल्यानंतर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.- अन्नपाण्यावाचून तडफडत असलेल्या नागरिकांचे लोंढे बाहेर पडतील, अशी भीती व्यक्त होत आहे. अन्नाबाबत विसरा, वीज विसरा, इंधन विसरा. - जर तुम्ही जगणार असाल, तरच या गोष्टींचा विचार करा, असे हंबरडा फोडत पॅलेस्टिनी रेड क्रिसेंटच्या प्रवक्त्या नेबल फरसाख म्हणाल्या.

१३ ओलिसांचा मृत्यू इस्रायलने गाझावर केलेल्या हवाई हल्ल्यात ओलीस ठेवलेल्या १३ इस्रायलींचा मृत्यू झाल्याचे हमासने म्हटले आहे. ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर हमासने त्यांना ओलिस ठेवले होते.

२७ अमेरिकनांचा मृत्यूयुद्धात किमान २७ अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. १४ लोक अद्याप बेपत्ता आहेत. युद्धग्रस्त भागात आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिका चार्टर विमाने पाठविणार असल्याचे व्हाइट हाउसने जाहीर केले. 

आम्ही साऱ्या जगावर राज्य करू : हमासइस्रायल हे तर आमचे पहिले लक्ष्य आहे. सर्व जगावर आमचे राज्य प्रस्थापित करू, अशी दर्पोक्ती हमास या दहशतवादी संघटनेचा कमांडर महमूद अल् झहर याने केली आहे. या जगात कोणीही कोणावर अन्याय करू नये, असे त्याने म्हटले आहे.

मोठ्या संघर्षाची  वाढती भीती  -इस्रायलने अलीकडच्या काही दिवसांत लेबनॉनच्या हिजबुल्ला या अतिरेकी गटावरही हल्ला केला.सध्या येथील सीमेवर शांतता असली, तरी व्यापक संघर्षाची भीती निर्माण झाली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये मुस्लीम प्रार्थनांमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा निषेध केल्यानंतर जेरुसलेमच्या जुन्या शहरात तणाव वाढला आहे. 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायल