कटाची कुणकुण लागूनही २६/११ रोखता आले नाही
By Admin | Updated: December 23, 2014 00:45 IST2014-12-23T00:45:12+5:302014-12-23T00:45:12+5:30
मुंबई हल्ल्याच्या कटाची कुणकुण भारतासह ब्रिटन व अमेरिका यांनाही लागली होती; पण त्यांच्यात समन्वय न झाल्यामुळे कुणकुण लागूनही हल्ला टाळता आला नाही.

कटाची कुणकुण लागूनही २६/११ रोखता आले नाही
न्यूयॉर्क : मुंबई हल्ल्याच्या कटाची कुणकुण भारतासह ब्रिटन व अमेरिका यांनाही लागली होती; पण त्यांच्यात समन्वय न झाल्यामुळे कुणकुण लागूनही हल्ला टाळता आला नाही.
२६-११च्या हल्ल्यासंदर्भात न्यूयॉर्क टाइम्सने अहवाल प्रसिद्ध केला आहे. न्यूयॉर्क टाइम्स, प्रो पब्लिका, पीबीएस सिरीज या तीन संस्थांनी हा अहवाल तयार केला असून, त्याचे नाव २००८ मुंबई किलिंग्ज, पाईल्स आॅफ स्पाय डाटा, बट अनकम्प्लिटेड पझल असे आहे. मुंबई हल्ल्याचा हा गुप्त इतिहास आहे असा दावा न्यूयॉर्क टाइम्सने केला आहे. २००८ साली झरार शहा हा संगणक तज्ज्ञ पाकिस्तानात बसून मुंबई हल्ल्याचा कट रचत होता. लष्कर ए तोयबाचा तंत्रज्ञ प्रमुख असणाऱ्या झरारने गुगल अर्थवरून मुंबईतील ठिकाणांची माहिती जमविली होती. त्याच्यावर भारत, ब्रिटनच्या गुप्तचर संघटनांचे लक्ष होते; पण दोन्ही देशांकडील माहिती एकत्र करून त्याचा माग काढता आला नाही. या दोन देशांशिवाय अमेरिकेची हेरगिरी चालू होती. या तीन देशांची माहिती एकत्र न आल्याने अखेर २६ नोव्हेंबरला मुंबईवर हल्ला झाला व त्यात १६६ लोकांचा बळी गेला. (वृत्तसंस्था)