250 प्रवाशांची नाव नदीत बुडाली
By Admin | Updated: August 5, 2014 02:50 IST2014-08-05T02:50:15+5:302014-08-05T02:50:15+5:30
बांगलादेशच्या पद्मा नदीत सोमवारी एक प्रवासी नाव बुडाली. या नावेत 25क् प्रवासी होते. नदीतील प्रवाहाचा वेग प्रचंड होता.

250 प्रवाशांची नाव नदीत बुडाली
ढाका : बांगलादेशच्या पद्मा नदीत सोमवारी एक प्रवासी नाव बुडाली. या नावेत 25क् प्रवासी होते. नदीतील प्रवाहाचा वेग प्रचंड होता. त्यामुळे आज सकाळी मुशीगंड भागात ही नाव उलटली. नावेत क्षमतेच्या दुप्पट प्रवासी होते.
नाव बुडाल्यानंतर दुर्घटनास्थळाजवळ असलेल्या इतर नावा आणि स्पीड बोटींच्या मदतीने 45 प्रवाशांचे प्राण वाचविण्यात आले. आतार्पयत दोन मृतदेह हाती लागले आहेत, असे घटनास्थळी उपस्थित एका अधिका:याने सांगितले. काही प्रवासी पोहून किना:यावर पोहोचले असण्याची शक्यता असली तरी अनेक लोक बुडून मृत्युमुखी पडले असण्याची भीती आहे, असे मुशीगंड पोलीस प्रमुख तोफाज्जल हुसैन यांनी सांगितले. नौदल व अग्निशमन दलाच्या कर्मचा:यांना बचाव व मदतकार्य सुरू केले असले तरी खराब हवामानामुळे मृतदेह किंवा जिंवत व्यक्ती शोधणो कठीण होऊन बसले आहे. पद्मा नदी सध्या उफाळलेली असून त्यामुळेही शोधकार्यात अडथळा येत आहे. नाव मदारीपूर येथे जात असताना ही दुर्घटना घडली.
बुडालेली नाव पिनाक-6 ला पाण्याबाहेर काढण्यासाठी एक जहाज तातडीने दुर्घटनास्थळी रवाना करण्यात आल्याचे बांगलादेश जलपरिवहन प्राधिकरणाच्या एका अधिका:याने सांगितले. याच भागात तीन महिन्यांपूर्वीही एक दुर्घटना घडली होती व तीत 5क् जण मृत्युमुखी पडले होते. बांगलादेशात 23क् नद्या असून येथे नाव दुर्घटना सातत्याने होतात. (वृत्तसंस्था)