सेक्स गुलामीला नकार देणा-या २५० मुलींची इसिसकडून हत्या

By Admin | Updated: April 21, 2016 16:42 IST2016-04-21T16:42:01+5:302016-04-21T16:42:01+5:30

इराकमध्ये सेक्स गुलाम बनायला नकार देणा-या २५० मुलींची इसिसने हत्या केल्याचे समोर आले आहे.

250 girls denying sex slavery | सेक्स गुलामीला नकार देणा-या २५० मुलींची इसिसकडून हत्या

सेक्स गुलामीला नकार देणा-या २५० मुलींची इसिसकडून हत्या

 ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. २१ - आदेश न मानणा-यांना अत्यंत क्रूरपणे संपवणा-या इसिसने उत्तर इराकमध्ये सेक्स गुलाम बनायला नकार देणा-या २५० मुलींची हत्या केल्याचे समोर आले आहे. इराकमधील सर्वात मोठे शहर मोसूलमध्ये हे हत्याकांड घडले. 
 
इसिसने या मुलींना अतिरेक्यांबरोबर विवाबंधनामध्ये रहाण्याचा आदेश दिला होता.  एक प्रकारे हा सेक्स गुलामगिरीचा आदेश होता. पण ज्या मुलींनी नकार दिला त्यांची अत्यंत निदर्यतेने इसिसने हत्या केली. मोसूलचा ताबा घेतल्यानंतर इसिसने मुलींना निवडून त्यांच्यावर अतिरेक्यांबरोबर विवाह करण्यासाठी जबरदस्ती सुरु केली. हा तात्पुरता विवाह  असल्याचे त्यांना सांगण्यात येत होते. 
 
पण ज्या मुलींनी नकार दिला त्यांची हत्या केली असे कुर्दीश लोकशाही पक्षाचे प्रवक्ते सैद मामुझिनी यांनी सांगितले. सेक्शुअल जिहाद नाकारणा-या आतापर्यंत २५० मुलींची इसिसने हत्या केली असून, काहीवेळा त्या मुलींच्या कुटुंबालाही संपवले असे मामुझिनी यांनी सांगितले. 
 

Web Title: 250 girls denying sex slavery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.