इस्नयलच्या हवाई हल्ल्यात 25 ठार

By Admin | Updated: July 11, 2014 00:32 IST2014-07-11T00:32:01+5:302014-07-11T00:32:01+5:30

हवाई दलाने हमासच्या अड्डय़ांना लक्ष्य करून बुधवारी हल्ले तीव्र केले. यात 25 जण ठार झाले.

25 killed in Isleil air raids | इस्नयलच्या हवाई हल्ल्यात 25 ठार

इस्नयलच्या हवाई हल्ल्यात 25 ठार

गाजा, जेरूसलेम : हवाई दलाने हमासच्या अड्डय़ांना लक्ष्य करून बुधवारी हल्ले तीव्र केले. यात 25 जण ठार झाले. उभय पक्षांत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षातील बळींची संख्या वाढून आता 76 झाली आहे. दरम्यान, पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी शेजारी ज्यू राज्यावर 15 रॉकेटचा मारा केला. 
इस्नयली लष्कराकडून सोमवारपासून हमासच्या दहशतवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत मारल्या गेलेल्यांत महिला व मुलांसह निम्मे नागरिक आहेत, असा दावा गाजातील एका वैद्यकीय अधिका:याने केला आहे. 
 खान युनिस शहरातील एका घराजवळ केलेल्या हवाई हल्ल्यात आठ पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले, असे पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रलयाने म्हटले आहे. याच भागातील एका कॅफेवर झालेल्या हल्ल्यात नऊ जण मारले गेले. खान युनिसमध्ये एका इमारतीतील लोक मारले जाण्याची घटना दुर्दैवी होती, असे इस्नयलच्या एका लष्करी प्रवक्त्याने म्हटले आहे. 

 

Web Title: 25 killed in Isleil air raids