भारत - चीनमध्ये २४ करार

By Admin | Updated: May 15, 2015 11:06 IST2015-05-15T10:38:54+5:302015-05-15T11:06:58+5:30

अंतराळ, विज्ञान, रेल्वे, स्मार्ट सिटी, पर्यटन, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांनी तब्बल १० अब्ज डॉलर्सच्या २४ करारांवर स्वाक्षरी केली.

24 agreements in India - China | भारत - चीनमध्ये २४ करार

भारत - चीनमध्ये २४ करार

ऑनलाइन लोकमत 

बीजिंग, दि. १५ - भारत व चीनने मैत्रीचे नव्या पर्वाला शुक्रवारी सुरुवात होणार असून अंतराळ, विज्ञान, रेल्वे, स्मार्ट सिटी, पर्यटन, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांनी तब्बल १० अब्ज डॉलर्सच्या २४ करारांवर स्वाक्षरी केली. 

चीन दौ-याच्या दुस-या दिवशी पंतप्रधान नरेंद्र बीजिंगमध्ये आले असून शुक्रवारी त्यांनी चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांची भेट घेतली. मोदी व केकियांग यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाची सुमारे ५० मिनीटे चर्चा झाली. या चर्चेअंती दोन्ही देशांनी २४ करारांवर स्वाक्षरी केली. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे भारतात दौ-यावर आले होते त्यावेळी या नेत्यांनी १८ करारांवर स्वाक्षरी केली होती. शांघाई येथे गांधवादी व भारतीय केंद्राची स्थापना, कुनंमिग येथे योग महाविद्यालय, चेन्नई व चीनमधील चोंगकिक तसेच हैदराबाद व किंगदाओ या शहरांना सिस्टर स्टेट बनवणे असे विविध करार याप्रसंगी करण्यात आले. चीनने काही मुद्यांवर नरमाईची भूमिका दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी हातभार लावावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. 

Web Title: 24 agreements in India - China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.