शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

ही कसली 'आई'? 3 वर्षांचा लेक वेदनेने तडफडत होता अन् 'ती' Video बनवत राहिली, अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 16:33 IST

तीन वर्षांच्या मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जमिनीवर तडफडत होता, परंतु रुग्णवाहिका बोलवण्याऐवजी महिलेने त्याचा व्हिडीओ काढला.

ब्रिटनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तीन वर्षांच्या सावत्र मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जमिनीवर तडफडत होता, परंतु रुग्णवाहिका बोलवण्याऐवजी महिलेने त्याचा व्हिडीओ काढला. मुलाचा दोन दिवसांनी रुग्णालयात मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. मात्र याप्रकरणी आता महिलेला दोषी ठरवत न्यायालयाने तिला 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, 7 ऑगस्ट 2021 रोजी मॅन्सफिल्डजवळील जॅक्सडेलमध्ये हार्वे बोरिंगटन पॅरामेडिक्स बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याची 23 वर्षीय सावत्र आई लीला बोरिंगटन त्यावेळी हार्वेसोबत घरी उपस्थित होती. मुलगा खुर्चीवरून खाली पडल्याचं लीलाने सांगितले. तो बोलू शकत नसल्यामुळे, तिने इमर्जन्सी कॉल करण्यापूर्वी पॅरामेडिक्सला त्याची स्थिती दाखवण्यासाठी एक व्हिडीओ बनवला.

वैद्यकीय तज्ज्ञांनी लीला यांच्या वाईट कृत्यांचा पर्दाफाश केला. हार्वेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या मेंदूत खूप रक्तस्त्राव झाला होता. मुलाच्या कवटीला आणि हातालाही फ्रॅक्चर झाल्याचे तपासात समोर आले आहे. तज्ज्ञांच्या मते खुर्चीवरून पडल्यामुळे अशा जखमा होत नाहीत. मुलाच्या डोक्यात वारंवार वार करण्यात आले असावेत, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

दोन दिवसांनंतर 9 ऑगस्ट रोजी हार्वेचा रुग्णालयात मृत्यू झाला. हॉलरॉयड कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान खरी आई कॅटी रडू लागली. लिलाने आपल्या मुलाची निर्घृण हत्या केली असल्याचं म्हटलं आहे. इमर्जन्सी नंबरवर कॉल करण्याऐवजी लीलाने हार्वेच्या वडिलांना "हे फक्त माझ्यासोबतच का होते?" असा मेसेज पाठवला होता. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने लीलाला दोषी ठरवत 15 वर्षांची शिक्षा सुनावली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी