दहशतवादी हल्ल्यात २३ सैनिक ठार
By Admin | Updated: July 8, 2017 01:54 IST2017-07-08T01:54:19+5:302017-07-08T01:54:19+5:30
इजिप्तच्या उत्तर सिनाई प्रातांतील लष्करी चौकीवर दहशतवाद्यांनी आत्मघाती कार हल्ला केला. यामध्ये २३ सैनिक ठार झाले तर

दहशतवादी हल्ल्यात २३ सैनिक ठार
ऑनलाइन लोकमत
कैरो/इस्मालिया, दि. 8 - इजिप्तच्या उत्तर सिनाई प्रातांतील लष्करी चौकीवर दहशतवाद्यांनी आत्मघाती कार हल्ला केला. यामध्ये २३ सैनिक ठार झाले तर २६ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. गाझा स्ट्रिपजवळील रफाह येथील सैन्यतळाच्या चौकीजवळ दोन कार भरधाव वेगात आल्या आणि त्या तील आत्मघाती दस्त्याने दोन्ही कारचा भीषण स्फोट घडवून आणला. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याही दहशतवादी गटाने घेतली नाही. सिनाई प्रांतास दहशतवादी संघटनांनी लक्ष्य केले असून, २0१३ पासून हजारो नागरिक हल्ल्यात मृत्युमुखी पडले.