पाकिस्तानातील स्फोटात २३ ठार
By Admin | Updated: December 13, 2015 22:30 IST2015-12-13T22:30:10+5:302015-12-13T22:30:10+5:30
पाकिस्तानच्या अफगाणिस्तानच्या सीमेला खेटून असलेल्या अशांत दक्षिण-पश्चिम कबायली क्षेत्रात रविवारी मोठ्या गर्दीच्या कपडा बाजारात झालेल्या स्फोटात २३ जण ठार, तर ७० जण जखमी झाले.

पाकिस्तानातील स्फोटात २३ ठार
पेशावर : पाकिस्तानच्या अफगाणिस्तानच्या सीमेला खेटून असलेल्या अशांत दक्षिण-पश्चिम कबायली क्षेत्रात रविवारी मोठ्या गर्दीच्या कपडा बाजारात झालेल्या स्फोटात २३ जण ठार, तर ७० जण जखमी झाले.
स्फोट परचिनार भागातील इदगाह बाजारपेठेत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींपैकी १५ जणांची प्रकृती गंभीर आहे. स्फोट आत्मघाती होता की दूरनियंत्रकाद्वारे घडवून आणला होता हे समजले नाही. या हिंसाचाराची जबाबदारी अजून कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.
हा भीषण स्फोट आम्ही घडवून आणला असल्याचा दावा ‘लष्कर ए झांगवी अल-अलामी’ या संघटनेने केला आहे. पराचिनार येथील ईदगाह बाजारातील स्फोटाची जबाबदारी आम्ही घेतो.
इराणमध्ये आणि बशर अल असाद यांनी अल्पसंख्य सिरियन मुस्लिमांवर केलेल्या अत्याचारांचा हा आम्ही अशा पद्धतीने सूड घेतला आहे, असे या गटाचा प्रवक्ता अली अबु सुफियान याने म्हटल्याचे ‘एक्स्प्रेस ट्रिब्युन’ने वृत्त दिले. (वृत्तसंस्था)