शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
2
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
3
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
4
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
5
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
6
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
8
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
9
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
10
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
11
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
12
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
13
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
14
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
15
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
16
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
17
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
18
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
19
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
20
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी

इस्रायलचे गाझावर हल्ले, विरोधात 22 देश एकवटले; पण एकाही मुस्लिम देशाचा पाठिंबा नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:32 IST

इस्रायलकडून सातत्याने गाझावर हल्ले सुरू आहेत.

इस्रायल गाझामधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर सातत्याने बॉम्बहल्ले करत आहे. या दरम्यान, इस्रायलने गाझाला जाणाऱ्या मदतीलाही अंशतः मान्यता दिली आहे. गाझाकडे जाणारे मार्ग इस्रायली सैन्याने रोखले होते. आता ही नाकेबंदी उठवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, अनेक युरोपीय देशांसह एकूण 22 देशांनी एकत्र येऊन इस्रायलविरुद्ध निवेदन जारी केले आहे.

या देशांची मागणी काय?

गाझाला पुरवल्या जाणाऱ्या मदतीत इस्रायलने कोणतेही अडथळे निर्माण करू नयेत, अशी मागणी या 22 देशांनी केली आहे. पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, या देशांमध्ये एकाही इस्लामिक देशाचा समावेश नाही. ऐरवी इस्लामिक देश उघडपणे पॅलेस्टाईनला पाठिंबा देतात, परंतु आता एकाही इस्लामिक देशाने पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला नाही.

या युरोपीय देशांनी इस्रायलविरुद्ध निवेदन जारी केलेया देशांमध्ये जर्मनी, फ्रान्स सारखे युरोपीय देश समाविष्ट आहेत, तर जपाननेही इस्रायलविरुद्ध निवेदन जारी केले आहे. याशिवाय ब्रिटन आणि न्यूझीलंडनेही इस्रायलकडे मागणी केली आहे की, गाझाला जाणाऱ्या मदतीत कोणताही अडथळा निर्माण करू नये. इस्रायलविरुद्ध निवेदने जारी करणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, कॅनडा, फिनलंड, एस्टोनिया, इटली, आयर्लंड, आइसलँड, लिथुआनिया, लाटविया, जपान, नेदरलँड्स, लक्झेंबर्ग, न्यूझीलंड, नॉर्वे, पोर्तुगाल, स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन आणि ब्रिटन यांचाही समावेश आहे. या देशांचे म्हणणे आहे की, इस्रायल गाझाला जाणारी मदत थांबवत असल्याने तेथील लोक उपासमारीने त्रस्त आहेत. 

इस्रायलविरुद्ध निवेदन जारी करणाऱ्या देशांनी म्हटले की, आमच्याकडे अशी माहिती आहे की, इस्रायलने गाझाला मर्यादित प्रमाणात मदत देण्यास सहमती दर्शविली आहे. पण आमची मागणी आहे की, इस्रायलने मदत पुरवठ्यात कोणताही अडथळा निर्माण करू नये. एवढेच नाही तर फ्रान्स, ब्रिटन आणि कॅनडाने इस्रायलला धमकी दिली आहे. या देशांनी म्हटले की, जर गाझाला मदत थांबवली, तर ते इस्रायलवर निर्बंध लादतील. याशिवाय, या देशांनी गाझावरील लष्करी कारवाई थांबवण्याची मागणीही केली आहे. 

इस्रायलचे उत्तरयाला उत्तर देताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या तीन देशांवर जोरदार हल्लाबोल केला आणि म्हटले की, तुमचा प्रस्ताव मान्य झाला तर त्यामुळे हमास आणखी मजबूत होईल आणि भविष्यात पुन्हा इस्रायलवर हल्ला करेल.

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायल