काबूल बॉम्बस्फोटात 21 जणांचा मृत्यू, 45 जण जखमी
By Admin | Updated: January 10, 2017 19:00 IST2017-01-10T19:00:30+5:302017-01-10T19:00:30+5:30
अफगाणिस्तानमधील काबूल शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात 21 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 45 जण गंभीर जखमी झाले आहेत

काबूल बॉम्बस्फोटात 21 जणांचा मृत्यू, 45 जण जखमी
ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. 10 - अफगाणिस्तानमधील काबूल शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात 21 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 45 जण गंभीर जखमी झाले आहेत. काबूलमधील दारुलमान मार्गावर अमेरिकन विद्यापीठ आणि नूर रुग्णालयाजवळ हे स्फोट झाले आहेत. या स्फोटामागे कोणाचा हात कोणी घडवून आणला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
एफपीच्या वृत्तानुसार, मृतामध्ये बहुतांश करुन संसेदत काम करणाऱ्या सर्वसामान्यांचा समावेश आहे.