अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता घेताच मोठे निर्णय घेतले आहेत. आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासा सध्या एका मोठ्या बदलातून जात आहे. नासा त्यांच्या सुमारे २१४५ कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आहे.
अमेरिकन मीडिया आउटलेट पॉलिटिकोने याबद्दल माहिती दिली आहे. कर्मचाऱ्यांना काढून टाकणे हे बजेटमध्ये कपात करण्याच्या आणि एजन्सीच्या कामाला अधिक प्राधान्य देण्याच्या योजनेचा एक भाग असल्याचे सांगण्यात आले आहे.
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
नासाच्या या निर्णयाचा वैज्ञानिक रचनेवर मोठा परिणाम होण्याची अपेक्षा आहे. पॉलिटिकोच्या अहवालानुसार, ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले जात आहे ते बहुतेक GS-13 ते GS-15 श्रेणीतील आहेत, ते अमेरिकन सरकारी सेवेतील वरिष्ठ पद मानले जाते.
कामावरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नासाने तीन पर्याय दिले आहेत.
लवकर निवृत्ती
बायआउट
स्थगित राजीनामा
ट्रम्प यांच्या निर्णयांचा नासावर परिणाम
नासाच्या प्रवक्त्या बेथानी स्टीव्हन्स यांनी रॉयटर्सला सांगितले की, "आम्ही आमच्या मोहिमेसाठी वचनबद्ध आहोत, परंतु आता आम्हाला मर्यादित बजेटमध्ये प्राधान्य द्यावे लागेल."
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात नासा आणि अमेरिकेच्या अंतराळ धोरणात अनेक बदल झाले आहेत. याचा परिणाम नासाच्या १८ हजार कर्मचाऱ्यांच्या टीमवरही झाला आहे.
इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अनेक देशांसाठी नव्या टॅरिफ दरांची घोषणा केली आहे. यासंदर्भात बोलताना ट्रम्प म्हणाले, अमेरिका, फिलिपीन्सवर 25 टक्के, इराकवर 30 टक्के, मोल्दोव्हावर २५ टक्के कर लादणार आहे, जो १ ऑगस्टपासून लागू होईल. यासोबतच, अमेरिका अल्जेरियावर ३० टक्के, लिबियावर ३० टक्के आणि ब्रुनेईवर २५ टक्के कर लादणार आहे.
फिलीपिन्स: २५%ब्रुनेई: २५%अल्जेरिया: ३०%मोल्दोव्हा: २५%इराक: ३०%लिबिया: ३०%
तत्पूर्वी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच दक्षिण कोरिया आणि जापानस 14 देशांवर टॅरिफ लादला आहे. यानंतर आज या 6 देशांवरही टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.