शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 07:52 IST

चीनने २०२३ मध्ये निश्चित केलेल्या धोरणानुसार ह्यूमनॉइड रोबोटिक इंडस्ट्री हा तांत्रिक निकषावर प्रगतीचा एक नवा आयाम असल्याचं म्हटलं होतं. ह्यूमनॉइड रोबोट्सच्या निर्मिती आणि व्यवसायासाठी २०२५ चं उद्दिष्टही निश्चित करण्यात आलं होतं.

चीनमधील बीजिंगच्या आग्नेय भागात असलेल्या यिझुआंगमध्ये नुकतीच एक मॅरेथॉन झाली. या मॅरेथॉनची जगभरात चर्चा व्हावी, असं त्यात काय विशेष होतं? - तर या मॅरेथॉनमध्ये माणसांबरोबर चक्क २० रोबोट्स (यंत्रमानव) धावले... आणि त्याहूनही महत्त्वाचं असं की, ही मॅरेथॉन अखेरीस जिंकली, ती हाडामासाच्या एका मानवी धावपटूनेच! यिझुआंग प्रांत म्हणजे चीनमधील अनेक मोठमोठाल्या टेक फर्म्सचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे झालेल्या या ह्यूमनाॅईड मॅरेथॉनमध्ये सुमारे १२ हजार माणसांबरोबर २० विविध आकारांचे, रंगांचे आणि उंचीचे रोबोट्स सहभागी झाले होते.

२१ किलोमीटरचं चढ-उतारांचं अंतर सगळ्यांना कापायचं होतं. या अंतरात माणसे स्वतःला ताजंतवानं करण्यासाठी पाणी प्यायली तर रोबोट्सनी आपल्या बॅटरीज बदलल्या. माणसांबरोबर स्पर्धा करताना रोबोट्स मागे पडत आहेत असं दिसलं तर त्यांच्या निर्मात्यांना त्यांच्या androids मध्ये बदल करण्याची परवानगी होती. पण अशा प्रत्येक ब्रेकसाठी पेनल्टी म्हणून त्यांची १० मिनिटं कमी केली जात होती. बीजिंग ह्यूमनाॅईड रोबोट्स इनोव्हेशन सेंटरने तयार केलेल्या ‘तियान पोंग अल्ट्रा’ नावाच्या रोबोटने ही मॅरेथॉन पूर्ण करायला दोन तास चाळीस मिनिटं घेतली. युगांडाच्या जेकब किप्लिमोचं २१ किलोमीटर मॅरेथॉनचं रेकॉर्ड ५६.४२ मिनिटांचं आहे. प्रत्यक्षात ही मॅरेथॉन जिंकलेल्या स्पर्धकाने हे अंतर एक तास दोन मिनिटांमध्ये कापलं.

रोबोट्स हे आपल्या आयुष्याचा भाग आहेत हे पण रोबोट्स आता आपल्याबरोबर मॅरेथॉनही धावू लागले आहेत, ही बातमी तशी विशेषच! चीनमध्ये झालेल्या या ह्यूमनॉइड मॅरेथॉनमध्ये अनेक कंपन्या आणि विद्यापीठांच्या संघांनी आपले रोबोट्स उतरवले. तांत्रिकदृष्ट्या हे रोबोट्स उत्तम होते, पण मॅरेथॉनमध्ये माणसांना मागे टाकणं किमान या पहिल्या मॅरेथॉनमध्ये तरी त्यांना जमलेलं नाही. दुसरीकडे चीनला रोबोटिक तंत्रज्ञानाच्या बाबतीतही अमेरिकेशी स्पर्धा करायची असल्यामुळे या मॅरेथॉनमधून एकप्रकारे चीनने आपल्या ताकदीचं प्रदर्शनच केलंय. पहिल्या ह्यूमनाॅईड मॅरेथॉनमध्ये माणसांनी रोबोट्सना हरवलं असलं, तरी चीनने तयार केलेले रोबोट्स हे पाश्चात्त्य कंपन्यांनी तयार केलेल्या रोबोट्सपेक्षा उजवे असल्याचे विजेत्या कंपनीने म्हटलं आहे. 

चीनने २०२३ मध्ये निश्चित केलेल्या धोरणानुसार ह्यूमनॉइड रोबोटिक इंडस्ट्री हा तांत्रिक निकषावर प्रगतीचा एक नवा आयाम असल्याचं म्हटलं होतं. ह्यूमनॉइड रोबोट्सच्या निर्मिती आणि व्यवसायासाठी २०२५ चं उद्दिष्टही निश्चित करण्यात आलं होतं. इंटरनेटवर चीनच्या तांत्रिक प्रगतीचं दर्शन घडवणारा भरपूर कंटेंट पाहायला मिळतो. कधी तिथला एखादा रोबोट बाईक चालवत असतो. कधी ते मार्शल आर्टमधल्या टेक्निक्सचं प्रदर्शन करत असतात. आपलं बलस्थान म्हणून सोशल मीडियावरून त्याचा भरपूर गाजावाजाही चीनने चालवला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रोबोटिक्स तंत्रज्ञान आणि एआय अर्थात कृत्रिम प्रज्ञा  मानवी क्षमतांवर मात करतील का, भविष्यात त्यामुळे मानवी क्षमतांचं महत्त्व कमी होईल का? असे अनेक प्रश्न सातत्याने चर्चेत असतात. पहिल्या ह्यूमनॉइड मॅरेथॉननंतर तरी या प्रश्नांची मिळणारी उत्तरं ‘नाही’ अशीच असतील, असं चित्र आहे.

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडी