सिरियात आत्मघाती हल्ल्यात २० ठार

By Admin | Updated: January 1, 2016 02:04 IST2016-01-01T02:04:24+5:302016-01-01T02:04:24+5:30

सिरियात कुर्दस्तानच्या सीमेलगत असलेल्या कौमिशला शहरात आत्मघाती हल्ल्यात २० जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सिरियाची

20 dead in suicide attack in Syria | सिरियात आत्मघाती हल्ल्यात २० ठार

सिरियात आत्मघाती हल्ल्यात २० ठार

बैरूत : सिरियात कुर्दस्तानच्या सीमेलगत असलेल्या कौमिशला शहरात आत्मघाती हल्ल्यात २० जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सिरियाची सरकारी न्यूज एजन्सी सानाने याबाबत वृत्त दिले आहे. या माहितीनुसार एका रेस्टॉरंटमध्ये बुधवारी रात्री उशिरा हे आत्मघातकी हल्ले झाले. यात १६ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २२ जण जखमी झाले आहेत. दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी हे हल्ले घडवून आणले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ख्रिश्चन समुदायाचे १३ नागरिक आहेत. दरम्यान, इसिसने सोशल मीडियाच्या माध्यमातून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात रेस्टॉरंटच्या इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 20 dead in suicide attack in Syria