जपानमध्ये माथेफिरुच्या चाकू हल्ल्यात १९ ठार

By Admin | Updated: July 26, 2016 05:20 IST2016-07-26T03:37:46+5:302016-07-26T05:20:01+5:30

जपानची राजधानी टोक्यो शहराच्या पश्चिमेला असलेल्या सागामिहारा येथे एका माथेफिरुने केलेल्या चाकू हल्ल्यात १९ जण ठार तर अनेक जण जखमी झाल्याची काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

19 killed in mice attack in Japan | जपानमध्ये माथेफिरुच्या चाकू हल्ल्यात १९ ठार

जपानमध्ये माथेफिरुच्या चाकू हल्ल्यात १९ ठार

ऑनलाइन लोकमत
टोक्यो, दि. २६ - जपानची राजधानी टोक्यो शहराच्या पश्चिमेला असलेल्या सागामिहारा येथे एका माथेफिरुने केलेल्या चाकू हल्ल्यात १९ जण ठार तर अनेक जण जखमी झाल्याची काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. 
येथील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार,  सागामिहारा येथील दिव्यांगांसाठी असलेल्या केंद्रावर एका माथेफिरुने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात १९ जण ठार झाले असून ४० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. ही घटना येथील स्थानिक वेळेनुसार पहाटे २.३० च्या सुमारास घडली. दिव्यांगांसाठी सोयी-सुविधा पुरविण्यासाठी उभारण्यात आलेल्या या केंद्राजवळ असलेल्या गार्डनमध्ये हा माथेफिरु काळ्या रंगाचे कपडे परिधान करुन आणि हातात शस्त्र घेऊन आल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले. 
दरम्यान, या माथेफिरुला पोलिसांनी अटक केली असून तो फक्त २६ वर्षाचा आहे. तसेच, तो या केंद्रातील माजी कर्मचारी असल्याचेही सांगण्यात येत असून त्याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. याचबरोबर, केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

 

Web Title: 19 killed in mice attack in Japan