अफगाणिस्तानातील हल्ल्यांत 19 ठार

By Admin | Updated: December 14, 2014 01:42 IST2014-12-14T01:42:43+5:302014-12-14T01:42:43+5:30

अफगाणिस्तानच्या दक्षिणोकडील हेलमंद प्रांतात भूसुरुंगांना नाहीसे करणा:या 12 जणांना तालिबान हल्लेखोरांनी शनिवारी सकाळी गोळ्य़ा घालून ठार मारले.

19 killed in Afghan wars | अफगाणिस्तानातील हल्ल्यांत 19 ठार

अफगाणिस्तानातील हल्ल्यांत 19 ठार

काबूल : अफगाणिस्तानच्या दक्षिणोकडील हेलमंद प्रांतात भूसुरुंगांना नाहीसे करणा:या 12 जणांना तालिबान हल्लेखोरांनी शनिवारी सकाळी गोळ्य़ा घालून ठार मारले. या हल्ल्यात 12 जण जखमीही झाले. अफगाणिस्तानातील तालिबान्यांनी केलेल्या आत्मघाती आणि बॉम्बस्फोटात एकूण 19 जण ठार झाले. 
अफगाणिस्तानच्या पोलिसांचे प्रवक्ते फरीद अहमद ओबेद यांनी ही माहिती वार्ताहरांना दिली. राजधानी काबूलमध्ये आत्मघाती हल्लेखोराने अफगाण सैनिकांना घेऊन जाणा:या बसवर हल्ला केला, त्यात सर्वोच्च न्यायालयाचा वरिष्ठ न्यायिक अधिकारी ठार झाला. काबूलच्या उत्तरेला असलेल्या नाटोच्या आंतरराष्ट्रीय छावणीजवळ बंडखोराने केलेल्या हल्ल्यात नाटोचे दोन सैनिक ठार झाले.  (वृत्तसंस्था)
 
 

 

Web Title: 19 killed in Afghan wars