पाकमध्ये मशिदीवर हल्ला : १८ ठार, ६० जखमी
By Admin | Updated: February 13, 2015 16:42 IST2015-02-13T16:24:39+5:302015-02-13T16:42:05+5:30
पाकिस्तानातील पेशावरमधील एका मशिदीवर शुक्रवारी अज्ञात दहशतवादी संघटनेच्या काही जणांनी हल्ला केला.

पाकमध्ये मशिदीवर हल्ला : १८ ठार, ६० जखमी
ऑनलाइन लोकमत
पेशावर, दि. १३ - पाकिस्तानातील पेशावरमधील एका मशिदीवर शुक्रवारी अज्ञात दहशतवादी संघटनेच्या काही जणांनी हल्ला केला. या हल्यात आत्तापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले असल्याची माहिती पाकिस्तान पोलिसांनी दिली आहे.
शुक्रवार असल्याने मोठया प्रमाणात मशिदीमध्ये लोक उपस्थित होते. यावेळी काही बंदुकधारी व्यक्तींनी उपस्थितीत असलेल्या निष्पाप लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. तसेच बॉम्ब हल्ला केला. गोळीबार करणा-यांनी सैन्यांचा गणवेश परीधार केला होता. त्यांच्या हाता ग्रेनेड सुध्दा होते. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही. शहरातील सर्वच हॉस्पिटलमध्ये हायअर्लट जारी करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. याआधी पेशावरमध्ये १६ डिसेंबर रोजी दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्यात १५० जणांचा मृत्यू झाला होता तर मृतांमध्ये १३६ विद्यार्थ्यांचा समावेश होता.