१७०० इराकी सैनिकांची हत्या, ट्विटरवर फोटो
By Admin | Updated: June 16, 2014 23:50 IST2014-06-16T23:50:07+5:302014-06-16T23:50:07+5:30
इराकमधील इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड द लवेंटचा (आयएसआयएल) आपल्या टिष्ट्वटर अकाऊंटवर १७०० इराकी सैनिकांची हत्या केल्याचा दावा केला आहे

१७०० इराकी सैनिकांची हत्या, ट्विटरवर फोटो
बगदाद : इराकमधील इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड द लवेंटचा (आयएसआयएल) आपल्या टिष्ट्वटर अकाऊंटवर १७०० इराकी सैनिकांची हत्या केल्याचा दावा केला आहे. या संघटनेने एका आठवड्यातच १७०० बंदी इराकी सैनिकांची अमानुष पद्धतीने हत्या केली असल्याचे आयएसआयएसच्या टिष्ट्वटर अकाऊंटवर म्हटले आहे. मात्र, या दाव्याला दुजोरा मिळू शकला नाही. अल-काईदाला मानणारी ही संघटना आपल्या विरोधकांत भीती पसरविण्यासाठी जाणीवपूर्वक अशी माहिती पसरवत असल्याचे मानले जाते. आयएसआयएसने टिष्ट्वटरवर टाकलेल्या छायाचित्रांमध्ये ६० इराकी सैनिकांसह दारूगोळा, ट्रक आणि इतर लष्करी सामग्री दिसते. (वृत्तसंस्था)