पाकमध्ये मुसळधार पावसाचे 160 बळी
By Admin | Updated: September 7, 2014 02:25 IST2014-09-07T02:25:17+5:302014-09-07T02:25:17+5:30
पाकिस्तानात मुसळधार पावसाने 16क् जणांचे प्राण घेतले असून 148 जण जखमी, तर 65क् घरे पूर्णपणो जमीनदोस्त झाली आहेत.

पाकमध्ये मुसळधार पावसाचे 160 बळी
इस्लामाबाद : पाकिस्तानात मुसळधार पावसाने 16क् जणांचे प्राण घेतले असून 148 जण जखमी, तर 65क् घरे पूर्णपणो जमीनदोस्त झाली आहेत. मान्सूनच्या मुसळधार पावसाने देशभर हाहाकार माजवला असून लष्कर प्रलयात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत आहे.
गेल्या बुधवारी सुरू झालेला हा पाऊस अजूनही सुरूच आहे. गेल्या 48 तासांत पाकव्याप्त काश्मीरमध्ये 668, इस्लामाबादेत 316, रावळपिंडीत 44क्, लाहोर 35क् व सियालकोटमध्ये 316 मिलिमीटर पाऊस झाला. 2क्1क् मध्ये पाकिस्तानच्या इतिहासातील
सर्वात भयंकर पाऊस होऊन त्यात 1,7क्क् लोक ठार झाले होते. (वृत्तसंस्था)