किम कार्दाशियनच्या मौल्यवान वस्तूंच्या चोरीप्रकरणी 16 जणांना अटक

By Admin | Updated: January 9, 2017 16:36 IST2017-01-09T16:16:21+5:302017-01-09T16:36:59+5:30

हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दाशियन हिच्यावर हल्ला करुन तिच्याकडील असलेल्या मौल्यवान वस्तूंची चोरी केल्याप्रकरणी फ्रान्स पोलिसांनी 16 संशयितांना अटक केली आहे.

16 people arrested for the abduction of Kim Kardashian's valuables | किम कार्दाशियनच्या मौल्यवान वस्तूंच्या चोरीप्रकरणी 16 जणांना अटक

किम कार्दाशियनच्या मौल्यवान वस्तूंच्या चोरीप्रकरणी 16 जणांना अटक

>ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. 09 - हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दाशियन हिच्यावर हल्ला करून तिच्याकडील असलेल्या मौल्यवान वस्तूंची चोरी केल्याप्रकरणी फ्रान्स पोलिसांनी 16 संशयितांना अटक केली आहे.
फ्रान्स पोलिसांनी पॅरिसमधील काही भागात छापा टाकून 16 संशयितांना अटक केली. यानंतर त्यांच्या चौकशीदरम्यान अभिनेत्री किम कार्दाशियनच्या मौल्यवान वस्तूंच्या चोरी प्रकरणाशी त्यांचा संबंध असल्याचे समोर आले आहे. ज्यावेळी अभिनेत्री किम कार्दाशियनच्या येथे चोरी झाली होती, त्यावेळी पोलिसांनी चोरट्यांच्या हाताचे ठसे घेतले होते. 
गेल्या ऑक्टोबर महिन्यात अभिनेत्री किम कार्दाशियन पॅरिसमधील एका फॅशन वीकमध्ये भाग घेण्यासाठी दाखल झाली होती. त्यावेळी ती ज्या हॉटेलमध्ये राहत होती. त्याठिकाणी दोन चोरट्यांनी चेह-यावर मास्क लावून तिला बंदुकीचा धाक दाखवत तिच्याकडील सोने आणि मौल्यवान वस्तूंची चोरी केली होती.  

Web Title: 16 people arrested for the abduction of Kim Kardashian's valuables