अमेरिकेतील टेक्सासमध्ये हॉट एअर बलून कोसळून १६ ठार
By Admin | Updated: July 31, 2016 03:27 IST2016-07-30T23:13:55+5:302016-07-31T03:27:40+5:30
अमेरिकेतल्या टेक्सास प्रांतात हॉट एअर बलून कोसळून 16 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अमेरिकेतील टेक्सासमध्ये हॉट एअर बलून कोसळून १६ ठार
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 30 - अमेरिकेतील टेक्सास प्रांतात प्रचंड मोठ्या आकाराचा उष्णवात फुगा (हॉट एअर बलून) कोसळून १६ जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सूत्रांनी सांगितले की, स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ७.४0 वाजता ही घटना घडली. दुर्घटनेच्या वेळी हा फुगा आॅस्टीनच्या दक्षिणेला ३0 मैलावर असलेल्या लॉकहार्टजवळील शेतांवरून उडत होता. या अपघातातून कोणी वाचले असेल, असे प्रथमदर्शनी वाटत नाही, असे काल्डवेल काऊंटीच्या शेरीफ कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. या कार्यालयाला पहिल्यांदा मदतीसाठी संदेश मिळाला होता.
उष्णवात फुग्याच्या टोपलीच्या भागात आग लागल्याने हा अपघात घडला असावा, असे सांगण्यात आले. फुग्याचे बास्केट जळालेल्या अवस्थेत आढळून आले. टेक्सास प्रांताचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.