एका 'kiss' साठी मोजले १५ लाख !
By Admin | Updated: December 17, 2014 19:17 IST2014-12-17T19:17:13+5:302014-12-17T19:17:13+5:30
आपल्या आवडत्या व्यक्तीचा kiss घेण्यासाठी एकाने तब्बल १५ लाख रुपये मोजले आहेत.

एका 'kiss' साठी मोजले १५ लाख !
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - आपल्या आवडत्या व्यक्तीचा kiss घेण्यासाठी एकाने तब्बल १५ लाख रुपये मोजले आहेत.
अमेरिकन टीव्ही अभिनेत्री डिएना अग्रोन ही एका सोशल नेटवर्किंग साईटच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. त्यावेळी डिएनाने एका चॅरिटेबल कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. यावेळी अभिनेत्रीला किस करण्यासाठी बोली लावण्यात आली. १ हजार रुपयापासून सुरू झालेली ही बोली २३ हजार डॉलरपर्यंत (१४,६३,४९०)थांबली. एका व्यक्तीने एका किससाठी जवळपास १५ लाख रुपये मोजले. १५ लाख रुपये मोजलेल्या व्यक्तीस अभिनेत्री डिएना अग्रोनने आपला किस दिला. 'किस'मधून मिळणारी रक्कम युध्दग्रस्त असलेल्या मुलांच्या सहायत्तासाठी खर्च करण्यात येणार आहे.