शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

ओमानमध्ये भारतीय खलाशांच्या जहाजावर हल्ला; ऑईल टँकरवरील १५ भारतीयांचा जीव टांगणीला, ४ गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 16:49 IST

ओमानच्या किनारपट्टीवर तेलवाहू जहाजावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.

Iran Israel US War: मिडल ईस्टमध्ये इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता टोकाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या निधनानंतर जगभरात तणाव वाढलेला असतानाच, रविवारी ओमानच्या किनारपट्टीजवळ एका तेलवाहू जहाजावर भीषण हल्ला झाला. महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्ट्रेट ऑफ होर्मुजजवळ हा हल्ला झाला असून, यामध्ये १५ भारतीय खलाशांसह एकूण २० जण अडकले होते. या हल्ल्यात चार खलाशी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्कायलाईट नावाचे जहाज, ज्यावर पलाऊचा झेंडा होता ते ओमानच्या मुसंदम द्वीपकल्पाजवळून जात होते. ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, खसाब बंदरापासून अवघ्या ५ सागरी मैलावर या जहाजाला लक्ष्य करण्यात आले. या जहाजावर एकूण २० क्रू मेंबर्स होते, ज्यामध्ये १५ भारतीय आणि ५ इराणी नागरिकांचा समावेश होता.

हल्ल्यानंतर तातडीने बचावकार्य राबवून सर्व खलाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असले तरी, चार जणांना गंभीर दुखापत झाली आहे. हा हल्ला नेमका कोणी आणि कोणत्या शस्त्राने केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या.

'स्ट्रेट ऑफ होर्मुज' का आहे महत्त्वाचे?

ज्या ठिकाणी हा हल्ला झाला, तो स्ट्रेट ऑफ होर्मुज हा जगातील सर्वात महत्त्वाचा समुद्री मार्ग मानला जातो. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के तेल याच मार्गावरून जाते. इथून जाणाऱ्या एकूण तेलापैकी ८० टक्क्यांहून अधिक तेल आशियाई बाजारपेठेत येते. हा मार्ग केवळ ५० किलोमीटर रुंद असून इराण आणि ओमानच्या मध्ये आहे. इराणने या मार्गावर आपले नियंत्रण असल्याचा दावा वारंवार केला आहे.

इराणकडून समुद्री मार्ग रोखण्याचा इशारा

अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यांचा बदला म्हणून इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने रेडिओद्वारे या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांना इशारा दिला आहे. इराणने अधिकृतपणे हा मार्ग बंद केला नसला तरी, येथून जाण्यास परवानगी नाही, असे मेसेज जहाजांना दिले जात आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्यांनी या मार्गावरून जाणारी वाहतूक थांबवली असून विमा कंपन्यांनी वॉर-रिस्क प्रीमियममध्ये मोठी वाढ केली आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेवर सावट

या हल्ल्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात खळबळ उडाली आहे. जर हा मार्ग पूर्णपणे बंद झाला, तर कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे. इराणचा मित्र देश असलेला चीन आपल्या गरजेच्या ९० टक्के तेल इराणकडून याच मार्गाने आयात करतो, त्यामुळे चीनच्या भूमिकेकडेही जगाचे लक्ष लागले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Attack on Ship in Oman: Indian Sailors in Danger.

Web Summary : An oil tanker near Oman was attacked, endangering 15 Indian sailors. Four are seriously injured. The attack occurred near the Strait of Hormuz, a critical oil route. Tensions are high amidst Iran-Israel conflict, potentially impacting global oil supply and economy.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायल