शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

१४,००० मुले उपाशी; २२ देशांचा इस्रायलवर दबाव, इस्रायलवर निर्बंध लागू करण्याचा दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 12:14 IST

ब्रिटनने इस्रायलशी व्यापारासंबंधीची बोलणी थांबविली असून, निर्बंध लागू केले आहेत. व्हाईट हाऊसनेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

दीर-अल-बलाह (गाझा) : इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझापट्टीत नागरिकांचे प्रचंड हाल होत असून, १४ हजार मुलांची उपासमार होत आहे. या भागात मानवतावादी मदत पोहोचविण्यातही इस्रायल अडथळे आणत आहे. या पार्श्वभूमीवर मित्रराष्ट्र मानल्या जाणाऱ्या देशांसह २२ देशांनी इस्रायलवर दबाव वाढवला असून, वेळप्रसंगी निर्बंध लागू करण्याचा इशारा दिला आहे. ब्रिटनने इस्रायलशी व्यापारासंबंधीची बोलणी थांबविली असून, निर्बंध लागू केले आहेत. व्हाईट हाऊसनेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

या देशांच्या निवेदनात इस्रायलने गाझाला दिल्या जात असलेल्या मानवतावादी मदतीत अडथळे आणू नयेत, असे आवाहन केले आहे. या देशांत ब्रिटनसह युरोपातील देश तसेच कॅनडा आणि न्यूझीलंडचाही समावेश आहे. या २२ देशांत एकाही मुस्लीम राष्ट्राचा समावेश नाही. इस्रायलचे समर्थक मानले जाणारे अनेक देश यात आहेत, हे विशेष. लष्करी कारवाई इस्रायलने थांबवावी, असे या देशांना वाटते. 

हा आहे आक्षेप...हजारो लोकांची उपासमार सुरू आहे. यामुळे आजार वाढले असून, आवश्यक औषधांचा पुरवठा होत नसल्याने या लोकांचे प्राण वाचविणे कठीण झाले आहे. 

इस्रायल म्हणतो...गाझा भागात मदत पोहोचविण्यास इस्रायल राजी नाही. या देशांचे म्हणणे मान्य केले तर हळूहळू हमाससारख्या दहशतवादी संघटनेला बळ मिळेल आणि ते पुन्हा इस्रायलवर हल्ले करतील, अशी नेत्यान्याहू यांची भूमिका आहे. 

नव्या हल्ल्यांत ६० ठारसोमवारी रात्रभर इस्रायलने गाझापट्टीत केलेल्या हल्ल्यांत ६० हून अधिक लोक ठार झाले आहेत. जागतिक स्तरावर या हल्ल्यांच्या विरोधात अनेक देश एकवटले असतानाही इस्रायलने हे हल्ले थांबविलेले नाहीत. उलट हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे. 

ब्रिटनने लागू केले निर्बंधब्रिटनने इस्रायलशी मुक्त व्यापार कराराबाबची बोलणी थांबवली असून, इस्रायलवर निर्बंध लागू केले आहेत. सध्या दोन्ही देशांत  असलेल्या करारांवर याचा परिणाम होणार नाही. मात्र, नवे करार केले जाणार नाहीत. ब्रिटनसह कॅनडासह इतर देशही असे निर्बंध लागू करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Israelइस्रायलPalestineपॅलेस्टाइनIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध