शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

पाकमध्ये १४ जणांची गोळ्या घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 4:14 AM

पाकिस्तानात निमलष्करी दल जवानांच्या गणवेशात आलेल्या अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गुरुवारी १४ जणांची गोळ्या घालून हत्या केली.

इस्लामाबाद/कराची : पाकिस्तानात निमलष्करी दल जवानांच्या गणवेशात आलेल्या अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गुरुवारी १४ जणांची गोळ्या घालून हत्या केली. मृतांत पाकिस्तानच्या नौदलाचा कर्मचारी आहे. हिंसाचाराने अस्वस्थ असलेल्या बलुचिस्तान प्रांतातील ओरमारा भागातील मकरान कोस्टल महामार्गावर १५-२० जणांच्या सशस्त्र टोळीने कराची आणि ग्वादारदरम्यान प्रवास करीत असलेल्या पाच ते सहा बस अडवून तीन डझन प्रवाशांची ओळखपत्रे तपासली व त्यातील १६ जणांना उतरवून घेण्यात आले. त्यातील १४ जणांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले व दोन जण पळून जाण्यात यशस्वी ठरले, असे पोलिसांनी सांगितले.बलुचिस्तानचे पोलीस महानिरीक्षक मोहसीन हस्सन बट्ट यांनी हे हत्याकांड बुझी टॉप भागात पहाटे झाल्याचे सांगितले. बसमधील प्रवाशांची नियमित तपासणी होते. त्यामुळे हल्लेखोरांनी निमलष्करी दलाच्या जवानांचा गणवेश घालून या हत्या केल्या, असे बलुचिस्तानचे गृहमंत्री झिया लँगोव्ह यांनीसांगितले.ते म्हणाले, मृतांची ओळख पटलेली नाही. आम्ही हल्लेखोरांचा शोध घेत असून, चौकशी सुरू केली आहे. मृतांमध्ये नौदलाचा एक व किनारारक्षक दलाचा एक कर्मचारी मरण पावल्याचे लँगगोव्ह म्हणाले. पंतप्रधान इम्रान खान यांनी या हत्याकांडाचा तीव्र निषेध केला आहे. हत्याकांडाचा उद्देश स्पष्ट झालेला नाही, तसेच अजून कोणत्याही गटाने या हत्याकांडाची जबाबदारीही घेतलेली नाही. >अस्वस्थ बलुचिस्तानबलुचिस्तान हा इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर असून, तो पाकिस्तानचा सगळ्यात मोठा व गरीब प्रांतांपैकी एक आहे. बलुचिस्तान वांशिक, फुटीरवादी बंडखोरी आणि कट्टर विचारांनी त्रस्त आहे. देशातील अल्पसंख्य शिया मुस्लिम आणि पंजाब प्रांतातील वांशिक कार्यकर्ते यांना याआधी अगदी ठरवून ठार मारण्यात आले आहे.गेल्या आठवड्यात इसिसने क्वेट्टाच्या प्रांतीय राजधानीत हाजरा शिया समूहाला लक्ष्य करून २१ जणांना ठार मारले होते. या हल्ल्यात ६० जण जखमीही झाले होते. २०१५ मध्ये बलुचिस्तानच्या मात्सुंग भागात सशस्त्र बंदूकधाऱ्यांनी कराचीला निघालेल्या रेल्वेच्या दोन डब्यांतून दोन डझन प्रवाशांचे अपहरण करून त्यातील १९ जणांची खाद कोचा या डोंगराळ भागात हत्या केली.

टॅग्स :terroristदहशतवादीPakistanपाकिस्तान