शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

७६ किलोचा बॉम्ब लावून बांगलादेशच्या पंतप्रधानांना मारण्याचा कट; १४ दहशतवाद्यांना फाशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 18:32 IST

बांगलादेशच्या  (Bangladesh) पंतप्रधान शेख हसीना (Prime Minister Sheikh Hasina) यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली (attempt to kill PM Sheikh Hasina) १४ दहशतवाद्यांना हत्येची शिक्षा सुनाविण्यात आली आहे.

बांगलादेशच्या  (Bangladesh) पंतप्रधान शेख हसीना (Prime Minister Sheikh Hasina) यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली (attempt to kill PM Sheikh Hasina) १४ दहशतवाद्यांना हत्येची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. बांगलादेशच्या कोर्टानं आज यासंदर्भातील निकाल दिला आहे. जुलै २००० साली एका निवडणुक प्रचाराच्या रॅली दरम्यान पंतप्रधान शेख हसीना यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. ढाका येथील कोर्टाचे न्यायाधीश अबू जफर मोहम्मद कमरूज्जमां यांनी याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या १४ आरोपींना कठोर शिक्षा देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त करत फाशीची शिक्षा जाहीर केली आहे.

"देशाच्या सर्वोच्च पदाच्या व्यक्तीचा हत्येचा कट रचणाच्या गंभीर गुन्ह्यात समाजापुढे याचं उदाहरण तयार व्हावं यासाठी आरोपींना कठोर शिक्षा देणं गरजेचं आहे. त्यामुळे आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर तात्काळ कार्यवाही करावी आणि कोणत्याही कायद्याच्या सहाय्यानं शिक्षेवर स्थगिती आणली जाऊ नये", असं रोखठोक विधान न्यायाधीश अबू जफर यांनी केलं आहे. 

खटल्याच्या सुनावणीवेळी एकूण आरोपींपैकी ९ आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सर्व दोषी हे बंदी घालण्यात आलेल्या हरकत-उल-जिहाद बांगलादेश या संघटनेचे सदस्य आहेत. तर इतर पाच आरोपी फरार आहेत. तरीही त्यांच्या अनुपस्थितीतच कोर्टानं दोषींना शिक्षा सुनावली आहे.

निवडणूक रॅली दरम्यान रचला हत्येचा कटहरकत-उल-जिहाद बांगलादेशच्या दहशतवाद्यांनी २१ जुलै २००० साली दक्षिण-पश्चिम गोपाळगंज येथील कोटलीपाडा येथे एका मैदानाजवळ तब्बल ७६ किलो वजनाचा बॉम्ब लावला होता. याच ठिकाणी पंतप्रधान शेख हसीना यांची निवडणूक प्रचारसभा होणार होती. या कटात सामील असणारे आणखी काही जण अजूनही फरार आहेत. दरम्यान, फरार असणारे आरोपी सुरक्षा संस्थेच्या हाती लागल्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा दिली जावी, असं कोर्टानं नमूद केलं आहे. सुरक्षा यंत्रणांनी निवडणूक प्रचारसभा होण्याआधीच स्फोटकं शोधून काढली होती. त्यानंतर काही दिवसांनी प्रचारसभेच्या जवळच एका ठिकाणी आणखी ४० किलो स्फोटकं ताब्यात घेण्यात आली होती.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी