१३ धक्क्यांनी नेपाळ हादरले
By Admin | Updated: May 13, 2015 22:45 IST2015-05-13T22:45:53+5:302015-05-13T22:45:53+5:30
तीन आठवड्यांपूर्वीच्या विनाशकारी भूकंपाने उद्ध्वस्त झालेले नेपाळ नव्याने उभे राहण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच बुधवारी बसलेल्या

१३ धक्क्यांनी नेपाळ हादरले
काठमांडू : तीन आठवड्यांपूर्वीच्या विनाशकारी भूकंपाने उद्ध्वस्त झालेले नेपाळ नव्याने उभे राहण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच बुधवारी बसलेल्या १३ धक्क्यांनी हिमालयाच्या कुशीतील नेपाळमध्ये हाहाकार उडाला. मंगळवारीही ७.३ तीव्रतेच्या भूकंपाने नेपाळ हादरले होते.
भूकंपाच्या ताज्या धक्क्याने ईशान्येकडील डोंगरी भागाला जबर तडाखा बसला. काठमांडूच्या ईशान्येकडील या भागातील इमारती कोसळल्या असून जमीन खचल्याने दुर्गम भागातील रस्ते जागोजागी दुभंगले आहेत.
मंगळवारच्या भूकंपातील मृतांचा आकडा ७६ वर पोहोचला असून १,९८७ लोक जखमी झाले आहेत. सर्वाधिक तडाखा दोलाखा जिल्ह्याला बसला. तीव्रता पाहता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे नेपाळ पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.
बचाव पथके कामाला लागली असून अमेरिकेच्या लष्करी हेलिकॉप्टरचाही शोध घेतला जात आहे. यात हेलिकॉप्टर मदत मोहिमेवर असताना अचानक गायब झाले.
२५ एप्रिल रोजीच्या विध्वंसक भूकंपानंतर नेपाळला सतत धक्क्यावर धक्के बसत असल्याने नेपाळी जनतेत प्रचंड घबराट पसरली आहे. मंगळवारच्या भूकंपाने बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील अनेक भाग हादरले होते.
पूर्व आणि ईशान्य भारतही हादरला होता. चीनमध्ये धक्के जाणवले असून तिबेटमध्ये एक महिला ठार झाल्याचे वृत्त आहे.