इस्लामाबाद : पाकिस्तानात पोलिओचे 13 नवे रुग्ण आढळून आले असून यामुळे पोलिओग्रस्तांची संख्या वाढून 158 झाली आहे.
इस्लामाबाद येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑर हेल्थच्या पोलिओ व्हायरोलॉजी लॅबोरेटरीने पोलिओचे नवे रुग्ण आढळल्यास दुजोरा दिला. नव्या रुग्णांपैकी सात केंद्रीय राजवट असलेल्या आदिवासी भागातील, तीन खैबर पख्तुनख्वा प्रांतातील तर सिंध, पंजाब व बलुचिस्तान प्रांतातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. 2क्12 मध्ये पोलिओचे 58 रुग्ण आढळून आले होते. (वृत्तसंस्था)