फ्रान्समधील बारमध्ये लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू

By Admin | Updated: August 6, 2016 10:25 IST2016-08-06T10:23:33+5:302016-08-06T10:25:28+5:30

बारमध्ये लागलेल्या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. नॉरमँडी येखील कुबा लिबरे क्लबमध्ये ही आग लागली होती

13 people die in a bar in France | फ्रान्समधील बारमध्ये लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू

फ्रान्समधील बारमध्ये लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत - 
पॅरिस, दि. 06 - बारमध्ये लागलेल्या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. नॉरमँडी येखील कुबा लिबरे क्लबमध्ये ही आग लागली होती. अपघाताने ही आग लागली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. जखमींचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. 
 
बारमध्ये काही तरुण वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले होते. त्यावेळी मध्यरात्री ही आग लागली असल्याचं वृत्त स्थानिक वृत्तपत्रांनी दिलं आहे. नॉरमँडी येथे आठवड्याभरात घडलेली ही दुसरी दुर्घटना आहे. काही दिवसांपुर्वी इसीसशी संबंधित दोन हल्लेखोरांनी धर्मोपदेशकाची हत्या केली होती. तसंच काही जणांना ओलीस ठेवलं होतं. पोलिसांनी या हल्लेखोरांना ठार केलं होतं.
 

Web Title: 13 people die in a bar in France