११ वर्षांचा तनिष्क तीन विषयांत पदवीधर
By Admin | Updated: May 23, 2015 23:56 IST2015-05-23T23:56:44+5:302015-05-23T23:56:44+5:30
आज अमेरिकेत मूळ भारतीय असलेल्या तनिष्क अब्राहम (११) या अमेरिकन मुलाने शिक्षणात केलेल्या प्रगतीची जोरदार चर्चा आहे.

११ वर्षांचा तनिष्क तीन विषयांत पदवीधर
वॉशिंग्टन : आज अमेरिकेत मूळ भारतीय असलेल्या तनिष्क अब्राहम (११) या अमेरिकन मुलाने शिक्षणात केलेल्या प्रगतीची जोरदार चर्चा आहे. तनिष्क अगदी लहान वयात तीन विषयांत पदवीधर बनला आहे.
तनिष्क अब्राहम कॅलिफोर्नियातील सेक्रोमेंट येथे राहतो. त्याने गणित, विज्ञान आणि विदेशी भाषेत अमेरिकन विद्यापीठ रिवर महाविद्यालयाची पदवी मिळविली आहे. त्याच्यासोबत पदवी घ्यायला १८०० विद्यार्थी उपस्थित होते.
गेल्या वर्षीच अब्राहम कमी वयाचा हायस्कूल पदवीधर बनला होता. तो वयाच्या सातव्या वर्षापासून होम स्कूलमध्ये शिकतोय. गेल्या वर्षी मार्चमध्ये त्याने हायस्कूल पदविका मिळविली होती. तनिष्क अब्राहमचे हे यश पाहून राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्याला अभिनंदनाचे पत्रही पाठविले. वयाच्या चौथ्या वर्षापासून तो आयक्यू सोसायटी मेनसाचा सदस्य आहे. त्याची आई ताजी अब्राहम यांनी सांगितले की तो नेहमीच वर्गात पुढे असतो. अब्राहमला डॉक्टर, वैद्यकीय संशोधक आणि अमेरिकेचा राष्ट्रपती बनायचे आहे.