११ दहशतवाद्यांनी केला पेशावरचा हल्ला

By Admin | Updated: December 26, 2014 01:37 IST2014-12-26T01:37:40+5:302014-12-26T01:37:40+5:30

पेशावर येथील शाळेवर झालेला निर्घृण हल्ला ११ दहशतवाद्यांनी केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या हल्ल्यात १५० लोक ठार झाले

11 terrorists attacked Peshawar attack | ११ दहशतवाद्यांनी केला पेशावरचा हल्ला

११ दहशतवाद्यांनी केला पेशावरचा हल्ला

इस्लामाबाद : पेशावर येथील शाळेवर झालेला निर्घृण हल्ला ११ दहशतवाद्यांनी केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या हल्ल्यात १५० लोक ठार झाले असून, त्यात बहुतांश शाळकरी मुले आहेत. पाकिस्तानचे दहशतवादविरोधी पथक व पोलीस यांनी हा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार ११ दहशतवाद्यांपैकी ७ जण आत शाळेत गेले व चारजण त्यांना लागेल ती मदत करण्यासाठी दिवसभर बाहेर थांबले. संधी मिळताच ते पळून गेले.
११ दहशतवादी खैबर एजन्सीमधील लांडी कोटल येथून १६ डिसेंबरच्या सकाळी पेशावर येथे आले. पेशावर येथील अफगाण निर्वासितांच्या घुंडी शिबिरातून त्यांनी पेशावर येथील शाळेपर्यंतचा प्रवास केला. आधी तीन व नंतर चार अशा गटाने हा प्रवास करण्यात आला. रात्री हे लोक शाळेजवळच एका मशिदीत राहिले. (वृत्तसंस्था)


 

 

Web Title: 11 terrorists attacked Peshawar attack