शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

108 फूट उंची, 70 हजार sqft परिसरा अन् 700 कोटी खर्च; UAE मध्ये पहिले हिंदू मंदिर तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 15:28 IST

2015 पासून या मंदिराचे काम सुरू झाले होते. फेब्रुवारी महिन्यात PM मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन.

Hindu Temple in UAE: संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये पहिले हिंदूमंदिर बांधले जात आहे. अबुधाबीमध्ये उभारण्यात येणाऱ्या मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तब्बल 70 हजार चौरस फुटांमध्ये पसरलेल्या या मंदिराच्या उभारणीसाठी एकूण 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात यूएईला भेट देऊन या मंदिराचे उद्घाटन करू शकतात.

BAPS द्वारे मंदिराची उभारणीबोचासन निवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) या मंदिराची उभारणी करत आहे. याच संस्थेने दिल्लीतील अक्षरधाम मंदिर आणि अमेरिकेतील न्यू जर्सी येथे नुकतेच आशिया बाहेरचे सर्वात मोठे मंदिर बांधले आहे. BAPS ने जगभरात 1100 हून अधिक हिंदू मंदिरे बांधली आहेत. अबुधाबीमध्ये बांधण्यात येत असलेल्या हिंदू मंदिराची उंची 108 फूट आहे. या मंदिरात 40 हजार घनमीटर संगमरवरी आणि 1 लाख 80 हजार घनमीटर वाळूचा खडक वापरण्यात आला आहे.

मंदिरात स्थापित मूर्ती भारतातील कारागिरांनी तयार केल्या आहेत. मंदिराच्या बांधकामात 50 हजारांहून अधिक लोकांनी योगदान दिले आहे. यात भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अभिनेता संजय दत्त आणि अक्षय कुमारसह अनेकांचा समावेश आहे. मंदिर परिसरात मोठे गार्ड आणि लहान मुलांसाठी खेळाचे मैदानही असेल.

पंतप्रधान मोदी करणार उद्घाटनया मंदिराचे उद्घाटन फेब्रुवारीमध्ये होणार असून त्यात अनेक मान्यवरही सहभागी होणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याला पीएम मोदी आणि अबुधाबीचे शेख देखील उपस्थित राहू शकतात. अबुधाबीमध्ये 10 फेब्रुवारीपासून 'फेस्टिव्हल ऑफ हार्मनी' सुरू होत आहे, ज्यामध्ये भारतीय समुदायाचे लोक सहभागी होणार आहेत. 15 फेब्रुवारी 2024 रोजी हिंदू मंदिराचे उद्घाटन होणार आहे. 

2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी UAE दौऱ्यावर होते आणि यावेळी तेथील राष्ट्रपतींनी अबुधाबी-दुबई महामार्गावर भारताला 17 एकर जमीन भेट दिली होती. याच जागेवर हे मंदिर उभारले जात आहे. मंदिराचे बांधकाम 2015 पासून वेगाने सुरू आहे. विशेष म्हणजे, हे मंदिर बांधण्यासाठी स्टील किंवा काँक्रीटचा वापर केला गेला नाही. मंदिर इतके मजबूत केले आहे की ते पुढील 1000 वर्षे अबाधित राहील. 

टॅग्स :United Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीHinduहिंदूTempleमंदिरNarendra Modiनरेंद्र मोदी