अमेरिकेनं अफगाणिस्तानवर टाकला 10 हजार किलोचा शक्तिशाली बॉम्ब
By Admin | Updated: April 14, 2017 01:05 IST2017-04-13T22:53:50+5:302017-04-14T01:05:58+5:30
अमेरिकेच्या लष्करानं अफगाणिस्तानमधल्या इसिसच्या ताब्यात असलेल्या भूभागावर सर्वात मोठा नॉन-न्यूक्लियर बॉम्ब हल्ला केला

अमेरिकेनं अफगाणिस्तानवर टाकला 10 हजार किलोचा शक्तिशाली बॉम्ब
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 13 -अमेरिकेच्या लष्करानं अफगाणिस्तानमधल्या इसिसच्या ताब्यात असलेल्या भूभागावर सर्वात मोठा नॉन-न्यूक्लियर बॉम्ब हल्ला केला आहे. अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील इसिसचं प्रभुत्व असलेल्या भागात अमेरिकेनं हा हल्ला केला आहे, असं वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. अफगाणिस्तानमधल्या स्थानिक वेळेनुसार संध्या. 7 वाजताच्या दरम्यान हा हल्ला करण्यात आला आहे. इसिसचा उपद्रव असलेल्या भागात अमेरिकेकडून हा भीषण हल्ला करण्यात आला आहे. GBU-43 नावाचा जगातील सर्वात शक्तिशाली बॉम्बचा प्रयोग अमेरिकेने अफगाणिस्तानवर केला आहे.
पेंटागॉनच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेनं पहिल्यांदाच एवढा मोठा बॉम्ब टाकला आहे. या बॉम्बचं जीबीयू -43 असं नाव आहे. या बॉम्बला मदर ऑफ ऑल बॉम्ब असंही म्हटलं जातं. या शक्तिशाली बॉम्बचं वजन 21 हजार पौंड म्हणजेच 10 हजार किलोग्रॅम वजन आहे. अफगाणिस्तानच्या ननगरहार या भागात हा बॉम्ब टाकण्यात आला आहेत. ननगरहार हे ठिकाण पाकिस्तानच्या सीमेपासून अगदी जवळ आहे.
Biggest non nuclear bomb dropped in Afghanistan"s Nangarhar was 21,000 pounds and targeted ISIS says US Media sources pic.twitter.com/SHLbqyirr0
— ANI (@ANI_news) April 13, 2017
#WATCH Live shortly: White House briefing after US drops largest non nuclear bomb in Afghanistan"s Nangarhar https://t.co/rP9lF2tUxB
— ANI (@ANI_news) April 13, 2017