१०० मच्छीमार पाकच्या ताब्यात
By Admin | Updated: October 4, 2015 23:26 IST2015-10-04T23:26:00+5:302015-10-04T23:26:00+5:30
आंतरराष्ट्रीय सागरी सीमेचे कथितरीत्या उल्लंघन केल्याबद्दल पाकिस्तानने १०० भारतीय मच्छीमारांना अटक केली आहे.

१०० मच्छीमार पाकच्या ताब्यात
इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय सागरी सीमेचे कथितरीत्या उल्लंघन केल्याबद्दल पाकिस्तानने १०० भारतीय मच्छीमारांना अटक केली आहे.
सिंध प्रांताच्या दक्षिण भागात शनिवारी ही धरपकड झाली आणि या सर्व मच्छीमारांना प्रांतीय राजधानी कराचीत आणण्यात आले. रेडिओ पाकिस्तानने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या सागरी हद्दीत मच्छीमारी करणाऱ्या १२ भारतीय नौका जप्त करण्यात आल्या आहेत. या नौकांवर १०० मच्छीमार होते. सागरी हद्दीचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली आहे.
यापूर्वी पाकिस्तानी तटरक्षक दलाच्या प्रवक्त्याने शनिवारी ७० मच्छीमारांना अटक करण्यात आल्याचे सांगितले होते. (वृत्तसंस्था)