शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये टाकला 10 हजार किलोचा बॉम्ब

By admin | Published: April 14, 2017 5:32 AM

जगभरात दहशत पसरवलेल्या इस्लामिक स्टेट अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेच्या तळांना नष्ट करण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानातील ननगरहार भागात जगातील सर्वात मोठा

वॉशिंग्टन : जगभरात दहशत पसरवलेल्या इस्लामिक स्टेट अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेच्या तळांना नष्ट करण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानातील ननगरहार भागात जगातील सर्वात मोठा आणि सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्बहल्ला केला. पेंटागॉनचे प्रवक्ते एडम स्टम्प यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानच्या सीमेजवळ ननगरहार प्रांतात अचिन जिल्ह्यात इसिसचे बोगदे आणि बंकर असलेल्या परिसरात स्थानिक वेळेनुसार गुरुवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास हा हल्ला केला गेला. अफगाणिस्तानमधून इसिसचा पूर्ण सफाया करेपर्यंत अमेरिका सैन्य कारवाई करीत राहणार असल्याचेही अमेरिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. ‘मदर आॅफ आॅल बॉम्ब’ अशी ओळख असणाऱ्या २१ हजार पौंड वजनाच्या या बॉम्बच्या स्फोटाने दहशतवादी जगताला हादरा तर बसलाच, शिवाय अमेरिकेने आपल्या शक्तीचे पुन्हा दर्शन घडविले. ज्या भागात ‘जीबीयू ४३ बी मॅसिव्ह आॅर्डिनेन्स एअर ब्लास्ट’ बॉम्ब टाकण्यात आला तो इसिसचा प्रभाव असलेला परिसर आहे. या हल्ल्याने किती हानी झाली ते स्पष्ट होऊ शकले नाही. (वृत्तसंस्था)इसिसचे बोगदे आणि बंकरला केले लक्ष्यजीबीयू ४३ हे सर्वात मोठे शक्तिशाली हत्यार समजले जाते. व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव शॉन स्पाईजर यांनी सांगितले की, इसिसचे बोगदे आणि बंकरला या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले. हल्ल्यात नागरिकांचे मृत्यू टाळण्यासाठी अमेरिकेने या हल्ल्यापूर्वी आवश्यक ती सर्व सावधानता बाळगली होती. इसिसविरुद्धची लढाई आम्ही अतिशय गांभीर्याने घेतली आहे. हा हल्ला इसिसला पराभूत करण्याच्या मोहिमेचा एक भाग आहे. विघातकता किती?- १ हजार यार्डामध्ये आगीच्या ज्वाळा पसरतात.- १ मैल परिसरातील लोकांना, इलेक्ट्रॉनिक वस्तू, लाइट्स, वाहने यांना मोठी झळ, हादऱ्याने मृत्यू.- १.७ मैल परिसरातील लोकांचा धक्क्याने मृत्यू होऊ शकतो. अनेक घरांना/इमारतींना तडे जाऊ शकतात. - २ मैल परिसरातील लोकांना आवाजाने बहिरेपण येऊ शकते.- ५ मैल परिसरात भूकंपसदृश धक्के बसतात.- ३0 मैल परिसरातून या बॉम्बच्या १० हजार फूट उंच पोहोचलेल्या मशरूमच्या आकाराचे धूराचे लोळ दिसतात.या स्फोटाचे राजकीय जगात परिणाम काय?- अमेरिकेशी कटुता असणाऱ्या रशियावर मोठा दबाव.- दक्षिण चीन समुद्रावर दावा करणाऱ्या चीनला इशारा.- बॉम्बखोर उत्तर कोरियाला अमेरिकेने शक्ती दाखवली.- दहशतवाद्यांना पाळणाऱ्या पाकिस्तानला मोठा इशारा.