शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

"10 लाख मृत्यू, 10 कोटी रुग्ण..."; चीनमध्ये आणखी हाहाकार माजवणार Corona, तज्ज्ञांचा इशारा धडकी भरवणारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 18:59 IST

Corona In China : चीनमध्ये सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, तज्ज्ञांनी धडकी भरवणारे आकडे समोर ठेवले आहेत.

चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या या वाढत्या रुग्णसंखेने संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं आहे. केवळ चीन नाही, तर जपान, अर्जेंटिना, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि ब्राझील या देशांमध्येही रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे.

चीनमध्ये सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, तज्ज्ञांनी धडकी भरवणारे आकडे समोर ठेवले आहेत. आरोग्य अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की चीनमध्ये आगामी काळात एका आठवड्यात 3.7 कोटी लोकांना करोनाची लागण होऊ शकते. याच बरोबर, कोट्यवधी लोक कोरोना पॉझिटिव्ह होण्याची आणि लाखो लोकांचा मृत्यू होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

काय म्हणतायत तज्ज्ञ?माध्यामांतील वृत्तांनुसार, चीनमध्ये सातत्याने होत असलेल्या रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर, चीनमध्ये सुमारे 10 कोटी कोरोना रुग्ण आढळण्याची आणि 10 लाख जण मृत्यूमुखी पडण्याची शक्यता असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातील पल्मोनरी मेडिसिनचे एचओडी डॉ. नीरज कुमार गुप्ता (Dr. Neeraj Kumar Gupta) यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे की, "आम्ही गणितीय गणनेनुसार, चीनमध्ये 10 कोटींच्या जवळपास रुग्ण, 50 लाख लोक रुग्णालयात भरती आणि 10 लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता वर्तवत आहोत. जो एक मोठा आकडा आहे. सध्या चीन त्याच स्थितीत आहे, जसा भारत यापूर्वी होता. मात्र, आता व्हायरसचा सामना करण्यास भारत मजबूत स्थितीत आहे. चीनमधील लोकांची इम्युनिटी तेथील कडक लॉकडाऊनच्या धोरणामुळे फार कमी आहे." 

एवढेच नाही, तर डॉ. गुप्ता म्हणाले, "आपण पहिल्या लाटेचा सामना केला. नंतर, डेल्टा व्हेरिअंटचा सामना केला, जो अत्यंत घातक  होता. यानंतर, ओमिक्रॉन व्हेरिअंटचाही सामना केला. तो फारसा गंभीर नव्हता, पण फार वेगाने पसरत होता." 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू